कधी कधी काळ कोठून येईल हे सांगणे कठीणच आहे.रस्त्यावरून चालताना नेहमी सावधगिरी बाळगा.वाहन चालवताना दक्षता घ्यावी वाहनाचा वेग नियंत्रित असावा.असे नेहमी सांगितले जाते. लोकांना रस्ता सुरक्षा नियमांचे नियमित आणि काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले जाते.तरीही लोक नियमांना धता दाखवून वाहन चालवतात.
रस्त्यावरून जाताना नेहमी सावधगिरी बाळगावी असे सांगतात. तरी ही अपघात घडतात. नुकत्याच झालेल्या कार आणि ऑटोरिक्षा अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या अपघातात सुदैवाने महिला बचावली आहे.
या व्हिडीओ मध्ये एक महिला रस्ता ओलांडताना दिसत आहे. तेवढ्यात वेगाने येत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटो रिक्षाला धडक दिली त्यात ऑटो पालटून कारच्या पुढे गेली आणि रास्ता ओलांडत असलेली महिला त्यातून थोडक्यात बचावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.