भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका फोटो पोस्ट केला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोमध्ये धोनीची मुलगी झिवाच्या मांडीवर एक लहानगं बाळ झोपलेलं असताना दिसत आहे.
साक्षी धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर झिवाच्या मांडीवर एक लहानगं बाळ झोपलेलं असतानाचा एक फोटो पोस्ट केला. या पोस्टनंतर चाहत्यांनी अभिनंदन… असे मेसेज केले. साक्षीच्या या फोटोलो साडे पाच लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाची घोषणा केल्यानंतर धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.