"ह्या रेल्वेत कोणी टी.सी. येतो का?" बर्लिनमधे प्रवास करत असताना मी एकाला विचारलं... "माझं तिकीट कोणी का चेक करेल?"
जर्मन मित्र आश्चर्य व्यक्त करत म्हणाला. "गृहीत धर, की तू तिकीट काढलेलंच नाहीये. मग?"
त्याने गृहीत धरायचा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झालं नाही.
"तू कधी तुझ्या देशात विनातिकीट प्रवास केला आहेस?" त्यानेच उलट विचारलं.
"कितीतरी वेळा." मी म्हणालो.
"मला तुझ्या देशाबद्दल फारसं माहीत नाही." तो म्हणाला"..
पण, जर तू दोन रूपयाचा भ्रष्टाचार करत असशील,
तर तुमचे नेते दोनशे अरबचा तर करत असतीलच."