खूप चालायला लागयचं तेव्हा रडायला व्हायचं.
नंतर गाडी घेतली आणि चालायची सवय मोडून गेली.
गाडी विकल्यावर पायी चालणं कठीण झालं.
एकेदिवशी दवाखान्यात जायचं होतं.
नेमकी तिकडे जाणारी बस मिळाली नाही.
मग खूप चालून दवाखान्यात पोचलो.
पाय वैतागून दुखू लागलेले.
मी रिसेप्शन हॉलमधे बसलो.
माझ्या बाजूला बसलेला एक इसम म्हणाला,
"आज चालून चालून खूप खांदे दुखायलेत."
मला हसू आलं.
मी म्हणालो, "चालून तर पाय दुखतात."
नंतर माझी नजर त्याच्या काठ्यांकडे गेली.