सिग्नलवर उभ्या असलेल्या एका फकीराने हात पुढे केले.
मी खिसे तपासले तर फक्त दोन हजाराची नोट निघाली.
मी त्याला देऊन टाकली.
बाबा सांगायचे साधू-फकीराला रिकाम्या हाती धाडू नये.
तेव्हा मी विचारलेलं, "तो स्वस्थ, हट्टाकट्टा असला तरीही?"
त्यावर बाबांनी हजरत अली साहेबांचं एक वचन ऐकवलेलं,
"देवाने आपल्याला आपल्या लायकीपेक्षाही खूप दिलेलं असतं."
दुसऱ्या दिवशी मला पुन्हा त्या सिग्नलला थांबावं लागलं आणि मी पाहिलं..
कालचा भीक मागणारा फकीर आज नारळ विकतो आहे.