Absorb what is useful, discard what is useless and add what is specifically your own – Bruce lee
गांधींजी म्हणाले की वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नये. याच बोधवाक्यांना जागतिक मार्शल आर्ट किंग ब्रुसलीने आपल्या एका वेगळ्या शैलीमध्ये म्हटले आहे. ते म्हणाले-
Absorb what is useful, discard what is useless and add what is specifically your own
जे उपयुक्त आहे ते ग्रहण करा निरुपयोगी असल्यास काढून टाका आणि जे विशेषतः आपले आहे त्याला आपल्या आयुष्यात समाविष्ट करा.
गांधीजी ने ही गोष्ट चरित्र आणि धर्माबद्दल बोलली होती, पण आजच्या संदर्भात आपल्या व्यक्तिमत्त्वाला घेऊन ब्रूस ली ने म्हटलेली गोष्ट साजेशी आणि गरजेची वाटतं आहे.
ब्रुसली ने अगदी अचूक आणि साधीशी गोष्ट म्हटली आहे. ते म्हणाले की जे आपल्या आयुष्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे त्याला आपल्या व्यक्तित्वात समाविष्ट करावं, जी सवय किंवा गोष्ट आपल्यासाठी कामाची नाही त्याला आपल्या आयुष्यामधून काढून टाकावं. या दोन गोष्टीं नंतर सर्वात महत्वाची गोष्ट ते म्हणाले की त्या गुणांना ग्राह्य करा जे आपलेच आहेत.
आपल्या धर्मांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हे म्हटले आहे. एक बरोबर असतं आणि एक चुकीचं. बरोबर गोष्टीची निवड आपल्याला करायची आहे आणि चुकीच्या गोष्टीचा त्याग. यासाठी कुठलेही आध्यात्म समजण्याची गरजच नाही. ही फार काही तात्विक किंवा सखोल गोष्ट नाही, पण ह्याचा अर्थ फार सखोल आहे.
आपल्याला एवढेच करावयाचे आहे. कारण आपण बऱ्याच वेळा आपल्या व्यक्तिमत्वाला चांगलं बनविण्यासाठी अश्या लहान -लहान गोष्टींना समजावं लागतं. त्यासाठी काहीही युक्त्या लावण्याची गरजच नाही.
आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला आपल्या विवेक-बुद्धीनुसार समजायला हवं की आपल्यासाठी काय आवश्यक आहे, काय अनावश्यक आहे आणि कोणत्या गुणांना आपल्याला आपल्या चारित्र्यात सामावून घ्यायचे आहे.
फक्त लक्षात ठेवा- Absorb what is useful, discard what is useless and add what is specifically your own