Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विघातक वातावरणाकडे नेत आहे- नितीन राऊत

nitin raut
, रविवार, 12 मे 2024 (17:17 IST)
सध्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरु आहे. पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी डॉ. नितीन राऊत पुण्यात आले होते. काँग्रेस भवनात यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. 

ते म्हणाले, भाजप व पंतप्रधान नरेंद्र  मोदी देशाला विघातक वातावरणाकडे नेत आहे. देशात हुकूमशाही सुरु आहे. भाजपने अबकीबार 400 पारची घोषणा दिली असून ही घोषणा देशाचे संविधान बदलण्यासाठी आहे. संविधान बदलण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहे. भाजप म्हणते की संविधान बदलणार नाही. आरक्षण रद्द करणार नाही. मोदी सर्व प्रकारची गॅरेंटी देतात मात्र त्यांच्या जाहीरनाम्यात संविधानाची गॅरेंटी नाही. त्यामुळे त्यांचा हा डाव संविधान बदलण्यासाठी आहे.असं म्हणत निशाणा साधला. 

ते म्हणाले, या वेळी संपूर्ण देशात अंडर करंट दिसत आहे. आता तीन टप्प्यांचे मतदान पार पडले असून देशात भाजप विरोधी वातावरण दिसत आहे. मोदींना याची जाणीव झाली असून त्यांची मानसिकता बिघडलेली आहे. भाजप विरोधी राग जनतेत दिसत आहे. लोक जरी बोलत नसले तरीही मतदानातून आपला राग दाखवणार आहे.

राज्य सरकारवर ताशोरे करत ते म्हणाले, एससी, एसटी विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट लावून शिंदे- पवार- फडणवीस सरकार दलित व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आरक्षण संपुष्टात आणण्याच्या तयारीत असून संविधानाला संपुष्टात आणण्याचे प्रत्यन सुरु असल्याचे ते म्हणाले.  
 
Edited by - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आम्ही दिल्लीतील खेचरांना कायमचे पाणी पाजू,म्हणत उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल