Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

kamal 600
, शनिवार, 18 मे 2024 (18:38 IST)
रवींद्र धंगेकर यांच्या नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भाजप चे राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप, महेश वाबळे यांच्यासह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यांच्यावर आचारसंहिता असतानाही बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करून उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दरम्यान भाजप आणि कॉग्रेस कडून आंदोलन करण्यात आली. या वेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्ये आणि नेते आक्रमक झाले होते. 

लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर भाजपकडून पैसे वाटप करण्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. आता त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या बाबत पोलीस शिपाई अभिजित वालगुडे यांनी सहकार पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे. त्यात त्यांनी आचारसंहिता भंग करणे, बेकायदा जमाव जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या