सांगली लोकसभा ठाकरे गटाला सोडण्यात आला असून ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्याविशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी 'सांगली लोकसभेतून चंद्रहार पाटील विजयी होतील, असं वक्तव्य केलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
"मी विशाल पाटील यांना काहीही म्हटलेलं नाही, मी चंद्रहार पाटील योग्य आहेत असं म्हटलं आहे. निवडणुकीचा हा विषय आता पुढं गेला आहे. हा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीला महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. तुमच्या घरातील ऑफिसमध्ये बसून निवडणुकीला उभं राहू शकत नाही किंवा कोणाचे तरी नातेवाईक आहात एवढ पुरेस नाही, असा टोलाही शालिनीताई पाटील यांनी लगावला.
Edited By - Ratnadeep Ranshoor