महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर परेडची सलामी घेतली. त्यांनी राज्यातील जनतेला आणि जगातील तमाम मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राने ज्या पद्धतीने प्रगती केली आहे, त्यामुळे भविष्यात सर्वसामान्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण होतील आणि पुढेही वाटचाल करत राहील, असा माझा विश्वास आहे, असं ते म्हणाले. फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.
या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावत म्हणाले की, एखादी व्यक्ती सतत बडबड करत असेल तर त्याला उत्तर देण्याची काहीच गरज नाही. या वेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले, मंगळवारी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदानाच्या टक्केवारीचे आकडे पाहता मतदानाची टक्केवारी कमी दिसत आहे. त्यामुळे जास्तीतजास्त मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कारण मतदान हा आपला हक्क आहे. ते बजावले पाहिजे.
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक प्रमुख जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ज्या प्रमुख जागांवर मतदान होणार आहे, त्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदार संघ, सांगली मतदार संघ, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा आणि हातकणंगले येथे मतदान होणार आहे.