Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; ४० जणांचा समावेश

sharad panwar
, बुधवार, 3 एप्रिल 2024 (09:39 IST)
देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे.प्रत्येक पक्ष प्रचारात व्यस्त आहे. जवळपास आता सगळ्याच जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. भाजपा, अजित पवार गट, शिंदे गट आणि ठाकरे गटाने स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्या आहेत.  याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  
 
आज शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.
 
आतापर्यंत पाच उमेदवारांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत.
 
या बड्या नेत्यांना यादीत स्थान
1 – शरद पवार
२- सुप्रिया सुळे
3 – पी.सी.चाको
4- जयंत पाटील
५ – फौजिया खान
6 – अमोल कोल्हे
7- अनिल देशमुख
8- एकनाथ खडसे
9- जितेंद्र आव्हाड
10- वंदना चौहान
11- धीरज शर्मा
12- सिराज मेहंदी
13- शब्बीर विद्रोही
14- सोनिया दुहान
15 – राजेश टोपे
16- यशवंत गोसावी
17 – बाळासाहेब पाटील
18- रोहित पवार
19 – पार्थ पोळके
20 – जयदेव गायकवाड
21- अशोक पवार
22- शशिकांत शिंदे
23 – अरुण लाड
24 – प्राजक्ता तनपुरे
25- सुनील भुसारा
26- नसीम सिद्दीकी
27- विकास लवांडे
28 – रोहित आर. पाटील
29- राजू आवळे
30 – रोहिणी खडसे
31- मेहबूब शेख
32- प्रकाश गजभिये
33 – रवी वर्पे
34 – पंडित कांबळे
35- नरेंद्र वर्मा
36 – राज राजापूरकर
37 – संजय काळबांडे
38- जावेद हबीब
39 – कुमारी सक्षणा सलगर
40 - कुमारी पूजा मोरे

Edited By - Ratnadeep Ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महायुतीत राजकीय भूकंप होणार? हेमंत गोडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत