शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची 1 जूनपर्यंत अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. काल केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर मुख्यमंत्री आज हनुमान मंदिरात पोहोचले. त्यांनी पत्नी सुनीता आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात प्रार्थना केली.सीएम केजरीवाल यांनी आप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधत . भाजपवर जोरदार निशाणा साधला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, सर्वांना माझ्या शुभेच्छा. मी 50 दिवसांनी तुरुंगातून थेट तुमच्याकडे आलो आहे, बरं वाटतंय. ही बजरंगबलीची कृपा आहे. 'आप'च्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. पंतप्रधानांनी तुम्हाला चिरडण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी मला तुरुंगात पाठवले. त्यांनी आपल्या पक्षात सर्वाधिक चोरांचा समावेश केला.
केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पार्टी भाजपला आव्हान देईल असा पंतप्रधानांचा विश्वास आहे. पीएम मोदींनी एक धोकादायक मिशन सुरू केले आहे आणि ते म्हणजे वन नेशन वन लीडर.. त्यांना देशातील सर्व्ह नेत्यांना संपवायचे असून सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकायचं असून भाजपच्या सर्व नेत्यांची सुटका करून घ्यायची आहे.
म्हणून त्यांचे राजकारण संपवायाचे आहे. - ममता बॅनर्जी, स्टॅलिन, उद्धव ठाकरे हे तुरुंगात असतील .काही दिवसांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे राजकारण संपवण्याचा कट रचला जात आहे. भाजप जिंकला तर योगी आदित्यनाथांचे राजकारण संपवतील.
केजरीवाल पुढे म्हणाले की, जर तुम्हाला भ्रष्टाचाराशी लढायचे असेल तर केजरीवालांकडून शिका. मी माझ्या नेत्याला भ्रष्टाचाराविरोधात सीबीआयकडे सोपवले होते. हुकूमशहाला लोकशाही संपवायची आहे. हुकूमशहापासून देशाला वाचवण्याची वेळ आली आहे.त्यांनी ही निवडणूक जिंकली तर दोन महिन्यांत यूपीचा मुख्यमंत्री बदलला जाईल. जी हुकूमशाही आहे. पंतप्रधानांना देशातील सर्व नेत्यांना संपवायचे आहे.
केजरीवाल म्हणाले की, मला 140 कोटी लोकांचा पाठिंबा हवा आहे. हा देश वाचवायचा आहे. मला लोकशाही वाचवायची आहे. मी मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्यासाठी आलो नाही, नोकरी सोडून इथे आलो आहे. मी माझ्या देशासाठी सर्वस्व अर्पण केले आहे.
2014 मध्ये भाजपचे नेते वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्त होतील असा नियम खुद्द मोदींनीच केला होता. पुढील वर्षी 17 सप्टेंबरला मोदीजी 75 वर्षांचे होत आहेत. मला विचारायचे आहे की, मोदीजी, तुम्ही अमित शाह यांच्यासाठी मते मागत आहात का?
आम्हाला भाजपला विचारायचे आहे की तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? आधी योगींना हटवू आणि नंतर अमित शहांना पंतप्रधान करू. मोदींची ही हमी कोण पूर्ण करणार? अमित शहा ते पूर्ण करणार का? 4 जूननंतर भाजप सरकार स्थापन होणार नाही. हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड, यूपी आणि इतर राज्यांमध्ये त्यांच्या जागा कमी होत आहेत. भारतात आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे.