Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रायगडमध्ये अनंत गीते नावाचे तीन उमेदवार

anant geete
, मंगळवार, 16 एप्रिल 2024 (20:21 IST)
social media
उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी अशी थेट लढत रायगडमध्ये होत आहे. परंतु तिथे एकाच नावाचे तीन उमेदवार उभे ठाकल्याने अनंत गीतेंची खासदारकी धोक्यात आली आहे. २०१४ मध्ये सुनिल तटकरे नाम साधर्म्यामुळे अवघ्या २००० मतांनी पडले होते. तीच पुनरावृत्ती आता १० वर्षांनी घडविण्याची जोरदार तयारी तटकरेंनी केली आहे.
 
अनंत गीते यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून अनंत गीते नावाचे आणखी दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. यामुळे ठाकरेंच्या अनंत गीतेंची मते या दोन अपक्ष गीतेंना जाण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेने २०१४ मध्ये खेळलेला डाव आता तटकरे २०२४ मध्ये खेळत आहेत.
 
मुख्य उमेदवारांशी नावसाधर्म्य असलेली खेळी ही प्रामुख्याने विरोधकांकडून खेळली जाते. अनेकदा याचा फटका देखील पडलेला निवडणुकांत दिसला आहे. गीते यांची निशानी मशाल असणार आहे. तर अद्याप या दोन अपक्ष गीतेंना निशानी देण्यात आलेली नाही.
 
२०१४ मध्ये सुनिल तकटकरे नावाच्या व्यक्तीला निवडणुकीत उतरविण्यात आले होते. त्याने खऱ्या तटकरेंची सुमारे १० हजार मते खाल्ली होती. राष्ट्रवादीच्या तटकरेंना २००० मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यावेळी गीते निवडून आले होते व केंद्रात अवजड उद्योग मंत्रीही झाले होते.

Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सांगली : कोणी उमेदवार दिला जाणार असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे-विशाल पाटील