यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुका वर्षाच्या अखेरीस होणार आहे. विधानसभा निवडणूक वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपडेट दिले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्रीनी महायुतीतील जागावाटप बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे भाकीत केले असून जागावाटपाचा निर्णय येत्या 8 ते 10 दिवसांत घेण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला या वेळी त्यांनी विधानसभा निवडणुकी कधी होणार या बद्दलचे विधान केले. या वेळी ते म्हणाले, निवडणुका दोन टप्प्यात झालेले जास्त चांगले
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. यंदा दिवाळी 1 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. सणांचा काळात निवडणुका होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतर निवडणुका होणे अपेक्षित आहे.