महाराष्ट्र आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आज सुरु आहे. सकाळी 7 वाजे पासून संध्याकाळी 6 वाजे पर्यंत मतदान सुरु असणार आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभेच्या जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
तर झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात 38 जागांवर मतदान होत आहे. या सगळ्या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यात काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी होणार नाही.
महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे कमी मतदान झाले आहे. तर झारखंडमध्ये मतदानाचा वेग महाराष्ट्रापेक्षा चांगला आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे,
तर झारखंडच्या 38 जागांपैकी काही जागांवर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी 23 ऑक्टोबरला होणार आहे. यासोबतच अनेक राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणुकाही होत आहेत.
महाराष्टात मतदान संथ गतीने सुरु आहे. पक्षच्या नेत्यांनी नागरिकांना मतदानासाठी बाहेर पाडण्यासाठी आवाहन केले आहे.