राज्यात सत्ताधारी महायुतीची बैठक झाली असून या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीने पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढवल्यावर 200 जागा जिंकू असा आमचा विश्वास आहे. आमचा लढा माविआच्या तीन पक्षांशी नसून चार पक्षांशी आहे. चौथा पक्ष खोटे पसरवणे आहे. ज्याचा फायदा विरोधकांना झाला.
विरोधकांना खोटं बोलण्याची सवय झाली आहे आणि त्याचा फायदा त्यांना मिळत आहे. अजित दादा म्हणाले, सकारात्मक कामांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. जनतेत जाऊन भेटायचं आहे.
विरोधी पक्षाचे नेते सकाळी 9 वाजे पासून जे काही खोटं पसरवतात ते दिवसभर दिसते.जनतेत चुकीचा संदेश जातो. त्यामुळे तुमचे योग्य काम पुन्हा पुन्हा सांगा.निवेदन करण्यापूर्वी पक्षांच्या वरिष्ठांशी चर्चा करा.कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी वरिष्ठांशी चर्चा करा
फडणवीस म्हणाले, 'अजितदादा म्हणाले की, जागावाटपावरून पक्षाच्या कोणत्याही नेत्याने नाराज होण्याची गरज नाही, विजय जास्त महत्त्वाचा आहे. संघटना म्हणजेच महायुतीप्रमाणे एकदिलाने लढायचे असेल, तर आगामी निवडणुकीत 200 जागा जिंकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.