राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असून सर्व पक्ष तयारीला लागले आहे. राज्यात सत्ताधारी पक्ष महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी मध्ये सध्या वाद सुरु असून पक्ष एकमेकांच्या उमेदवारांवर टीका करत आहे. राज्यातील राजकीय पेच वाढत आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद सुरु झाला आहे.
या बाबत महाराष्ट्र काँग्रेसचे निवडणूक प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले, अद्याप मुख्यमंत्र्यांच्या चेहरा कोण असेल या बाबत चर्चा झाली नाही.आम्ही एमव्हीएच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवत आहो.निवडणुकी नंतर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत चर्चा केली जाणार.
तर या वर संजय राऊतांनी भाष्य केले की राज्यात पुढील सरकार फक्त ठाकरे 2 बनवणार.उद्धव ठाकरे हेच राज्यात निवडून येतील. ठाकरे 2 म्हणजे महाविकास आघाडी या वेळी ठाकरे 2 चे सरकार निवडून येणार. असे म्हणाले.
भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवडणुकीची कमान दिल्यावर राऊत म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे, हे आमच्यासाठी चांगले लक्षण आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रात येतील आणि जास्तीत जास्त सभा घेतील आणि फडणवीस त्याचे शिल्पकार असतील, त्यामुळे हे चांगले लक्षण आहे, यामुळे आमच्या 25 जागा आणखी वाढतील. त्याचा फायदा आम्हाला होणार.