सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तवली जात असून सर्व पक्ष तयारीला लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे त्यांनी आपल्या पक्षातील दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी शिवडीतुन बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे यांची नावे जाहीर केली आहे.
बाळा नांदगावकर हे सुरुवातीपासून राज ठाकरे यांच्या सोबत असून शिवडी विधानसभेचे माजी आमदार आहे. त्यांनी शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांचा पराभव केला होता.
पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
संदीप देशपांडे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी मिळू शकते. वरळी विधानसभेतून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आमदार आहे. त्यांच्या विरोधात राज ठाकरे संदीप देशपांडे यांना उभे करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.