Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने कार्यकर्त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अधिक जागांवर लढण्याची तयारी करण्यास सांगितले

congress
, शनिवार, 20 जुलै 2024 (12:12 IST)
महाराष्ट्र काँग्रेस ने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. सोमवारी कोअर कमिटीचे सदस्य, आमदार आणि खासदार यांच्यात राज्यातील आगामी निवडणुकांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र निवडणूक प्रभारी रमेश चेनिथला उपस्थित होते. 

या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जागावाटप संदर्भात कोणतीही शिथिलता देऊ नये अशी सूचना दिली आहे.राज्यातील नेत्यांनी मित्रपक्षांच्या दबावाला बळी न पडता विजयी होण्याच्या विश्वासाने अधिक जागांवर लढण्याची तयारी करावी. 

 या बैठकीत जागावाटप फार्मुला बद्दल केसी वेणूगोपालांनी कोणताही हस्तक्षेप किंवा दबाव नसल्याची ग्वाही दिली. 
या बैठकीत एमएलसी मध्ये  क्रॉस वोटिंगच्या मुद्द्यालाही घेतले असून सात आमदारांची ओळख पातळी असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असे वेणू गोपाल म्हणाले.  

महायुतीचा भ्रष्टाचार आणि गैर कारभार उघडकीस आणण्यासाठी ऑन ग्राउंड आणि सोशल मीडिया मोहीम राबवून सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना या मोहिमेशी जोडले जाणार. अशा निर्णय घेण्यात आला. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी जिल्हास्तरापासून बूथ स्तरापर्यंत उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोर्टाने इंद्राणी मुखर्जीला 10 दिवसांसाठी युरोपला जाण्याची परवानगी दिली