Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे अदानींचे सरकार आहे, म्हणत राहुल गांधींचा नांदेड़ मध्ये भाजपवर हल्लाबोल

rahul gandhi
, शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 (11:33 IST)
सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पक्ष आणि विपक्ष एकमेकांवर शाब्दिक वार करत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे खासदार राहुल गाँधी यांनी नांदेड़ मध्ये एक सभा घेतली आणि या रॅलीला संबोधित करताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने धारावी अडाणीकडे सोपवली आहे. हे सरकार जनतेचे नसून अदानींचे सरकार आहे. तुमचे सरकार अडाणीने विकत घेतले आहे.
सध्या देशात बेरोजगारी वाढत आहे. महगाई तर गगनला भेड़ली आहे. अस असून देखील अडानी अम्बानीचे काहीच नुकसान होत नाही. त्यांना विमानतळ,बन्दर आणि आता धारावी देखील देण्यात आली आहे. त्यांच्या संपतीत भरघोस वाढ होत असल्याचे ते म्हणाले.  

राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने भारतीय शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले .मात्र हजारो कोटी रूपये अडानी यांना मुंबईत दिले जात आहे. 

आम्ही भारत जोड़ो यात्रा केलि मात्र भाजपा सर्वत्र द्वेष पसरवत आहे. राज्यांना आपसात लढवण्याचे काम भाजप सरकारचे आहे. 
मणिपुर हिंसाचार झाला पण नरेंद्र मोदी आज पर्यन्त तिथे गेले नहीं. मला धारावी हवी होती म्हणून ते (अदानी) बसले होते, मग याच सरकारने धारावी अदानीकडे सोपवली, असे राहुल म्हणाले. ते म्हणाले की, भारताचा आत्मा संविधानात आहे.कांग्रेस संविधानाचे रक्षण करत असल्याचे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi: बंटेंगे तो कटेंगे घोषणे वर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रया