Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
, सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (15:27 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून दुपारी 3 वाजे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व मतदार संघामध्ये होणाऱ्या लढतीचे चित्र अधिकच स्पष्ट होणार. 

यंदा महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदार संघासाठी 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 नामनिर्देशन पत्र अर्जासाठी दाखल केले आहे. 

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढा होणार असून अपक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 
विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता 15 ऑक्टोबर पासून लागू झाली आहे. 22 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिसूचना जाहीर करण्यात आली. अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. आज सोमवार 4 नोव्हेंबर रोजी अर्जासाठी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 10 हत्तींच्या मृत्यूप्रकरणी क्षेत्र संचालकासह 2 अधिकारी निलंबित, एलिफंट टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार