rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विघ्नहर्ता, संकटमोचक ओझर येथील श्री विघ्नेश्वर

Shri-Vighaneshwar-Ozar
, शनिवार, 30 ऑगस्ट 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : विघ्नेश्वर मंदिर ओझर हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कुकडी नदीच्या काठावर वसलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक  आठ प्रमुख मंदिरांपैकी सातवे मानले जाते. येथे भगवान गणेशाच्या विघ्नेश्वर किंवा विघ्नहर्ता स्वरूपाची पूजा केली जाते, ज्याचा अर्थ "अडथळे दूर करणारा" असा आहे.
मंदिराची वैशिष्ट्ये- 
विघ्नेश्वर मंदिर हे अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. मंदिराची रचना सुंदर आणि प्राचीन आहे, ज्यामध्ये दगडी तटबंदी आणि पूर्वाभिमुख गणेश मूर्ती आहे. मूर्तीच्या डोळ्यांत माणिक आणि कपाळावर व नाभीवर हिरे जडलेले आहे. मंदिराला चारही बाजूंनी मजबूत दगडी तटबंदी आहे, आणि मंदिरात गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली आहे, आणि त्यांच्या पत्नी सिद्धी व रिद्धी यांच्यासह मूर्ती शोभिवंत आहे. मंदिराचा इतिहास पेशव्यांच्या काळाशी जोडला जातो; 1785 मध्ये चिमाजी अप्पांनी मंदिर बांधले आणि त्यावर सोनेरी कळस चढवला.
विशेषता: मंदिरात गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंतीसारखे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. येथे येणाऱ्या भाविकांना शुभ कार्यात यश मिळते, अशी श्रद्धा आहे.
पौराणिक कथा-
एकदा अभिनंदन नावाच्या राजा ने इंद्राचे पद मिळविण्याची इच्छा बाळगली आणि त्यासाठी त्याने यज्ञ केला.इंद्राला हे कळतातच ते फार चिडले आणि त्या राजाचा यज्ञ थांबविण्यासाठी विघ्नासुराला त्या ठिकाणी पाठविले.विघ्नासुराने त्या राजाच्या यज्ञ कार्यात फार अडथळे निर्माण केले.पृथ्वीलोकातील सर्व लोकं ब्रह्मदेव आणि शंकराकडे मदत घेण्यासाठी गेले.त्यांनी गणपती तुझी मदत करतील त्यांच्या कडे जा असे सांगितले. पृथ्वीलोकातील सर्वानी गणेशाचे स्तवन केले.त्यांच्या प्रार्थनेला स्वीकारून त्यांच्यावर प्रसन्न होऊन गणपतीने पाराशर ऋषींच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि विघ्नासुराशी युद्ध करून त्याचा प्रभाव केला आणि राजाचे सर्व विघ्न दूर केले.त्यावेळी पासून ते विघ्नेश्वर म्हणून प्रख्यात झाले. सर्वानी गणेशाचे वंदन करून त्यांचे आभार मानले.त्यांनी या ठिकाणी गणेशाच्या विघ्नेश्वर स्वरूपाची स्थापना केली.सर्वांचे विघ्न हरणारे असे हे विघ्नेश्वर आहे .
उत्सव- 
अंगारकीचतुर्थीला इथे गणेश भक्तांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. तसेच गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीला उत्सव साजरे केले जाते. कार्तिक पौर्णिमेला इथे दीपमाळांची रोषणाई केली जाते. 
विघ्नेश्वर मंदिर ओझर जावे कसे?
पुणे शहरापासून सुमारे 85 किमी अंतरावर, पुणे-नाशिक महामार्गावरून नारायणगावमार्गे ओझरला पोहोचता येते. तसेच जवळचे रेल्वे स्टेशन पुणे किंवा नाशिक आहे.
ALSO READ: ज्ञान व बुद्धीचा अधिपती मोरगावचा मोरेश्वर, महादेवांचा नंदी इथं मयूरेश्वराच्या मंदिराबाहेर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाकुंभाची व्हायरल गर्ल मोनालिसा आता दक्षिण चित्रपटांमध्ये पदार्पण करणार