Maharashtra Tourism : २२ जानेवारी २०२६ रोजी म्हणजेच आज माघी गणेश जयंती आहे. पुण्याला 'गणेशाची नगरी' मानले जाते, त्यामुळे या दिवशी पुण्यातील मंदिरांमध्ये मोठी गर्दी आणि उत्सवाचे वातावरण असते. यानिमित्त आज आपण पुण्यातील काही अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत गणपती मंदिरे पाहणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊन बाप्पाचे आशीर्वाद घेऊ शकतात.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे केवळ पुण्याचेच नाही तर जगातील सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे. येथील गणपतीची मूर्ती अत्यंत देखणी असून ती सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेली असते. माघी गणेश जयंतीला येथे विशेष फुलांची सजावट आणि उत्सव असतो.
कसबा गणपती
कसबा गणपती मंदिर हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. जिजाऊ माँसाहेबांनी या मंदिराची स्थापना केली होती.
तांबडी जोगेश्वरी गणपती
तांबडी जोगेश्वरी गणपती मंदिर येथील मूर्ती दरवर्षी विसर्जित केली जाते, पण हे ठिकाण अत्यंत जागृत मानले जाते.
गुरुजी तालीम गणपती
पुण्यातील गुरुजी तालीम गणपती मंदिर हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते.
तुळशीबाग गणपती
पुण्यातील तुळशीबाग गणपती मंदिर येथील गणपतीची मूर्ती खूप मोठी आणि आकर्षक आहे.
केसरी वाडा गणपती
पुण्यातील केसरी वाडा गणपती येथे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात याच वाड्यातून केली होती.
सारसबाग गणपती
पुण्यातील सारसबाग गणपती हे मंदिर एका सुंदर बागेत आणि तळ्याच्या मध्यभागी आहे. पेशव्यांच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली होती. येथील गणपतीच्या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे, ज्याला 'सिद्धिविनायक' म्हटले जाते.
दशभुजा गणपती
कर्वे रोडवर असलेले दशभुजा गणपती हे मंदिर पेशवेकालीन आहे. येथील गणपतीला १० हात आहे, म्हणून याला 'दशभुजा' गणपती म्हणतात. माघी जयंतीला येथे भाविकांची मोठी रांग असते.
त्रिशुंड्या गणपती
त्रिशुंड्या गणपती हे मंदिर त्याच्या अद्भूत वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. येथील गणपतीला तीन सोंडा आहे. मंदिराच्या भिंतींवर कोरीव काम असून हे पुण्याचे एक ऐतिहासिक वैभव आहे.