rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Famous Three and a Half Shakti Peethas of Maharashtra देवीचे प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्र

Shaktipithe
, मंगळवार, 30 सप्टेंबर 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठे ही हिंदू धर्मातील देवीच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाची मंदिरे मानली जातात. तसेच ही शक्तिपीठे सतीदेवीच्या शरीराच्या अवयवांशी संबंधित असून, पौराणिक कथेनुसार सतीदेवीच्या मृत्यूनंतर भगवान शंकराने तिचे शरीर खांद्यावर घेऊन तांडव नृत्य केले. तेव्हा भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले, जे भारतभर विविध ठिकाणी पडले. यापैकी साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात असून अत्यंत जागृत असे आहे 
 
"साडेतीन" शक्तिपीठांचे महत्त्व 
महाराष्ट्रातील ही शक्तिपीठे साडेतीन मानली जातात, कारण सप्तशृंगी हे अर्ध शक्तिपीठ आहे, तर कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड हे तीन पूर्ण शक्तिपीठे आहे. ही मंदिरे भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असून, प्रत्येक मंदिराला स्वतःचे पौराणिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. नवरात्रीत या ठिकाणी विशेष पूजा, यात्रा आणि उत्सव आयोजित केले जातात.
 
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर 
कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई हे सर्वात जुने देऊळ असून या मंदिराचे बांधकाम राष्ट्रकूटांनी किंवा त्या आधी पासूनच शिलाहार राजांनी आठव्या शतकात केले होते. पुराणात याचा उल्लेख 108 पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साढे तीन शक्तिपीठांपैकी एक असे केलेले आहे. कोल्हापूरची अंबाबाईला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतात. ज्या वेळी मुघलांचे शासन होते त्या वेळी त्यांनी हिंदूंवर सूड घेण्यासाठी सर्व देऊळांचा विध्वंस आणि नासधूस केली. त्यावेळी या देऊळाची मूर्ती तिथल्या पुजाऱ्याने बरीच वर्षे लपवून ठेवली. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत ई.स. 1715 ते 1722 या सुमारास मंदिराची पुनर्बांधणी केली. या देऊळात महालक्ष्मी आणि त्यांचा समोर गरुडमंडपात गरुड स्थापित केले गेले आहे. देवीची मूर्ती दगडी असून वजन 40 किलोग्रॅम आहे. मागील बाजूस दगडी सिंह आहे. देवी आईच्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनाग आहे.  
तुळजाभवानी मंदिर तुळजापुर
तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहार करून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे. स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे. भवानीआईच्या आशीर्वादाने महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असून खुद्द देवी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी तलवार दिली होती. या संदर्भात अशी आख्यायिका आहे की देवीचे हे देऊळ डोंगरमाथ्यावर असल्याने याचा कळस दिसत नाही. या देऊळाचे काही भाग हेमाडपंतीने बांधले आहे. नवरात्रोत्सव जरी नऊ दिवसाचा असला तरी हा उत्सव इथे एकूण एकवीस दिवस चालतो.
रेणुका देवी मंदिर माहूर गड 
माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही साढे तीन शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूरगडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजानी बांधले असे. आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला. माता रेणुकाची एक कथा आहे- या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांचा मुलगा परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुखी झाले असून शोकाकुल झाले होते. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुला दर्शनास येईल. पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला 'मातापूर' म्हटले जाऊ लागले. आणि शेजारीच आंध्रप्रदेशातील 'ऊर' गाव असल्यामुळे 'माऊर' आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते. 
सप्तशृंगी देवी मंदिर नाशिक 
या देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ म्हणून ओळखले जाते. ही सप्तशृंगी देवी नाशिक पासून 65 किलोमीटर वर 4800 फूट उंचीवर सप्तशृंगगडावर वास्तव्यास आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे. या मागील अशी आख्यायिका आहे की महिषासुर मर्दन करण्यासाठी देवी देवांनी त्याची याचना केली त्यामुळे देवी होमातून प्रकट झाली. तिचे हेच रूप म्हणजे सप्तशृंगीचे होते. हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात. हे ब्रह्मदेवाच्या कमंडळापासून निघालेल्या गिरीजा महानदीचे रूप तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक असे स्वरूप म्हणजे देवी सप्तशृंगी. या महिरपीत देवीची मूर्ती आठ फुटी उंच मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णी आहे. या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत. सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत. महिषासुराशी लढण्यासाठी देवीला सर्व देवांनी शस्त्रे दिलेली असे.
ALSO READ: स्वयंभू असे हे शक्तिपीठं 'वणीची देवी सप्तशृंगी'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात