Maharashtra Tourism : महाराष्ट्राला प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसेच महाराष्ट्र हे समृद्ध राज्य म्हणून ओळखले जाते. अनेक पर्यटक महाराष्ट्राला भेट देत असतात. तसेच पुणे हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर असून शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. एवढेच नाही तर पुणे शहर त्याच्या इतिहास आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते. येथे अनेक ठिकाणे आहे जिथे भेट देण्याचे नियोजन करता येते. तुम्ही देखील कुटुंबासह किंवा मित्रांसह येथील सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करण्याची योजना आखू शकता.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आढळतील, जी तुम्हाला आश्चर्यचकित करतील. जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि आधुनिकतेचा संगम पहायचा असेल तर पुणे शहर यासाठी परिपूर्ण असेल. पुण्यात तुम्हाला ऐतिहासिक किल्ले आणि आधुनिक कॅफे दोन्ही मिळतील.
पर्वती टेकड्या
पुणे शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी, एकदा तरी या ठिकाणी नक्कीच भेट द्या. येथे १०३ पायऱ्या असून ज्या चढल्यानंतर एक आकर्षक दृश्य पाहण्यास मिळते. सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी या ठिकाणाचे सौंदर्य चार पट वाढते.
शनिवार वाडा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा वारसा प्रतिबिंबित करणारा हा शनिवार वाडा पुण्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे.जो १७३२ मध्ये बांधला गेला होता, जे पेशव्यांचे निवासस्थान देखील होते. किल्ल्याची भव्यता आणि मोठे दरवाजे पर्यटकांना आकर्षित करतात. इतिहास प्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे.
आगा खान पॅलेस
हे पर्यटकांसाठी एक शांत आणि प्रेरणादायी ठिकाण आहे ज्यांचे वास्तुकला पाहण्यासारखे आहे. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी देखील जोडलेले आहे. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि सरोजिनी नायडू यांना येथे ब्रिटिशांनी नजरकैदेत ठेवले होते. हे पुण्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.
सिंहगड किल्ला
सिंहगड किल्ला ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. पुण्यापासून सुमारे ३५ किमी अंतरावर आहे जे ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्ही टेकड्या चढण्यासाठी आणि नैसर्गिक दृश्यांचा आणि थंड वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी जाऊ शकता. पावसाळ्यात या ठिकाणाचे दृश्य खूप सुंदर असते.
तसेच, तुळशीबाग, कात्रज प्राणी संग्रहालय, सारसबाग, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांसारखे अनेक ठिकाण पुण्यात तुम्हाला पाहावयास मिळतील. तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह पुण्यातील ही ठिकाणे एक्सप्लोर करण्याचा प्लॅन करू शकता.
पुणे जावे कसे?
पुणे हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर असून पुण्यात जाण्यासाठी अनेक बस सेवा उपलब्ध आहे. तसेच पुणे जंक्शन असून रेल्वे मार्ग अनेक प्रमुख शहरांना जोडलेला आहे. तसेच पुण्यातील विमान हे व्यस्त विमानतळ असून अनेक शहरातून पुण्यात येण्यासाठी विमान सेवा उपलब्ध आहे.