Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Women's Day ला मुंबईतील या तीन ठिकाणी नक्की भेट द्या

PehleBharatGhumo
, शुक्रवार, 7 मार्च 2025 (07:30 IST)
MaharashtraTourism : आठ मार्चला जागतिक महिला दिन असून हा दिन जगभरात साजरा केला जातो. तसेच महिला आपल्या कुटुंबासाठी सदैव उभ्या असतात. तसेच या धावपळीच्या जीवनात तुम्ही देखील आपल्या कुटुंबासोबत, मैत्रिणींसोबत महिला दिन विशेष नक्कीच फिरायला जाऊ शकतात. आज आपण मुंबई मधील असे प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहणार आहोत जिथे तुम्ही सहज पोहचू शकतात तसेच महिला दिन नक्कीच आनंदात साजरा करू शकाल. मुंबई ही महानगरी जाण्यासाठी देशातून अनेक सेवा उपलब्ध आहे.   तसेच वेळ घालवण्यासाठी मुंबई हे एक उत्तम ठिकाण आहे. याशिवाय, मुंबईची स्ट्रीट फूड संस्कृती देखील जगभर प्रसिद्ध आहे. जर तुम्ही महिला दिन कुठे साजरा करावा असा विचार करीत  असाल तर मुंबई मधील या ठिकाणी अवश्य भेट द्या.  
गेटवे ऑफ इंडिया  
मुंबई मधील 'गेटवे ऑफ इंडिया' हे मुंबईतील एक प्रमुख पर्यटन आकर्षण आहे, जिथे देश-विदेशातून लोक येतात. हे दक्षिण मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर असलेले एक स्मारक आहे. याला 'मुंबईचे हृदय' असेही म्हणतात. ही इमारत इंडो-सारासेनिक स्थापत्य शैलीमध्ये बांधली गेली आहे. त्याच्या सौंदर्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे समुद्र किनाऱ्यावरील स्थान आणि त्याची भव्य रचना. गेटवे ऑफ इंडियालाही खूप ऐतिहासिक महत्त्व आहे.  
मरीन ड्राइव्ह
मुंबईला जात असाल तर एकदा मरीन ड्राइव्हला नक्की भेट द्या. येथील लांब पक्के रस्ते आणि बसण्याची व्यवस्था यामुळे हे ठिकाण मुंबईतील इतर ठिकाणांपेक्षा वेगळे आहे. मरीन ड्राइव्हवरून सूर्यास्त पाहणे हा एक खास अनुभव असेल. हा मुंबईचा प्रसिद्ध समुद्रकिनारा मानला जातो.
 
webdunia
जुहू बीच
तिसरे सर्वात खास ठिकाण म्हणजे जुहू बीच. जुहू बीच हे असे ठिकाण आहे जिथे तुमच्या आवडत्या स्टार्सची घरे आहे. जर तुम्ही मुंबईला जात असाल तर या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका. हा समुद्रकिनारा एक प्रसिद्ध ठिकाण आहे. जुहू बीचच्या काठावर अनेक प्रसिद्ध स्टॉल आहे, जिथे तुम्ही वडा पाव, पाणीपुरी, भेळपुरी आणि इतर नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता. 
ALSO READ: International Women's Day 2025: महिलांना या पर्यटनस्थळी आहे विशेष सूट

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सानंदच्या रंगमंचावर 'द दमयंती दामले' हे नाटक सादर करण्यात येणार