Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्र विशेष :देवी चतुःशृंगी मंदिर माहिती मराठी : पुणे चतुःशृंगी देवी

नवरात्र विशेष :देवी चतुःशृंगी मंदिर माहिती मराठी : पुणे चतुःशृंगी देवी
, शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (21:14 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया 
देवी चतुःशृंगीचे मंदिर पश्चिम पुणे येथे एका टेकडीवर आहे.  पुणे शहरातील ही मुख्य देवी आहे.या देवीला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, अंबरेश्वरी,आणि चतुःशृंगी या नावाने ओळखले जाते. हे मंदिर निसर्गाच्या मधोमध आहे.हे मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे.हे मंदिर खूप जागृत आहे आणि देवी नवसाला पावणारी आहे. हे मंदिर उंच टेकडीवर आहे आणि मंदिरात जाण्यासाठी 100 पायऱ्या आहे. इथेच देवी दुर्गा आणि गणपतीचे मंदिर देखील आहे.जवळच वेताळ मंदिर देखील आहे. हे खूप मोठे मंदिर आहे.हे उंचीवर असल्यामुळे खूप सुंदर दिसते.डोंगरावर असल्यामुळे हे खूप आकर्षक दिसते.यामुळेच कदाचित वर्षभर भाविकांची गर्दी ओसंडून दिसते.
 
या मंदिराचे बांधकाम खूप जुने आहे. असं म्हणतात की या मंदिराचे बांधकाम मराठा साम्राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात झाले आहे. या मंदिराची पाहणी करण्याचे काम चतुर्श्रुंगी देवस्थान ट्रस्ट करतात.दरवर्षी येथे भाविकांची गर्दी बघायला मिळते.देवीच्या दर्शनासाठी भाविक दूरवरून येतात.
 
हे मंदिर सकाळी 6 वाजे पासून ते रात्री 9 वाजे पर्यंत उघड असतं.मंगळवारी हे देऊळ दुपारी 12 वाजता बंद ठेवतात.मंगळवारी आणि शुक्रवारी देवीआईची पूजा केली जाते.या दिवशी भाविकांची खूप गर्दी असते.
 
या मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण नऊ दिवस भाविकांची रांग असते.नवरात्रोत्सवाचा सण मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. या नऊ दिवसात मंदिरात रोषणाई केली जाते. मंदिराला आकर्षक रूपाने सजवतात.या दिवसात देवीआईला सजवतात.मोठी यात्रा काढतात.रात्रीच्या वेळी भाविकांची गर्दी दिसून येते.
नवरात्रोत्सवाच्या व्यतिरिक्त दिवाळी ,होळी,आणि गणेश चतुर्थी सारखे उत्सव देखील साजरे करतात.
 
कसे जायचे- 
बस मार्गे-मुंबईपासून दररोज मंदिरापर्यंत येण्यासाठी बऱ्याच बसेस आहे.आपण सातारा, रायगड आणि अहमदनगर वरून देखील बसने येऊ शकता.
रेल्वे मार्गे-शिवाजी नगर रेल्वे स्थानक ,खडकी रेल्वे स्थानक,आणि दापोडी रेल्वे स्थानक येथून जवळ आहे.
विमान मार्गे- लोहगाव विमानतळ,छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमान तळ, गांधीनगर विमानतळ आणि कोल्हापूर विमानतळ इथून जवळ आहे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्यन खानचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला