Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर

nivruttinath maharaj
, मंगळवार, 3 जून 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट् ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात संतांनी भक्तिमार्गाचे ज्ञान देऊन जीवन कसे जगावे याची अमूल्य शिकवण दिली. या संत मंडळींपैकी एक संत होते संत निवृत्तीनाथ. संत निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु होते. तसेच ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली, व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला.

संत निवृत्तीनाथांची समाधी महाराष्ट्रातील नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे आहे. तसेच निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य द्वादशीला असते. संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य १२ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला.

मंदिराचा इतिहास
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी १२१९ पासून त्र्यंबकेश्वर येथे आहे. तसेच श्री चांगदेव महाराजांचे शिष्य आणि अनुयायी त्या समाधीची पूजा करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये राहत होते. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. तसेच गोसावी कुटुंब पुजारी म्हणून काम करत होते. तसेच अनेक भाविक या समाधी मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून भेट देतात. तसेच मंदिरात होणाऱ्या वार्षिक उत्सवात देशभरातील लोकांचे स्वागत केले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संतांनी घेतलेली जिवंत समाधी होय.

मंदिर स्थापत्य आणि परिसर
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी मंदिरात भव्य वातावरण आणि वास्तुकला आहे. निवृत्तीनाथ महाराजांची मूर्ती २३० किलो चांदीपासून बनलेली असून मूर्तीसाठी एक रथ बनवण्यात आला होता आणि तो तज्ञ कारागिरांनी बांधला होता.  
ALSO READ: Saint Ziparu Anna Maharaj संत झिपरू अण्णा महाराज समाधी मंदिर
तसेच संत श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे पहिले प्रवर्तक आहे. म्हणून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे पहिले पीठ मानले जाते.

मंदिर उत्सव
श्री निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा ज्येष्ठ वद्याच्या १२ व्या दिवशी होतो. संस्थानकडून हा सोहळा पालखी सोहळा म्हणून साजरा केला जातो. तसेच यावेळी, शहरातील पुजाऱ्यांच्या कुटुंबाकडून समाधी सोहळा केला जातो. कालावधीत त्र्यंबकेश्वर येथे ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केले जाते. आणि ज्येष्ठ वद्याच्या १२ व्या दिवशी समाधी सोहळा साजरा केला जातो.

निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर निसर्गाच्या सौंदर्याच्या मध्यभागी वसलेले आहे. तुम्ही देखील कुटुंबासह येथे नक्कीच भेट देऊ शकतात.

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर जावे कसे?
नाशिक हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर असून त्र्यंबकेश्वर  येथे जाण्यासाठी नाशिकमधून परिवहन बस देखील उपलब्ध आहे. तसेच नाशिक हे रस्ता मार्ग, हवाई मार्ग आणि रेल्वे मार्गाने अनेक प्रमुख शहरांना जोडलेलं आहे. कॅप किंवा स्थानिक बस, रिक्षा यांच्या मदतीने मंदिरापर्यंत सहज पोहचता येते.
ALSO READ: संत मुक्ताबाईं समाधी मंदिर मुक्ताईनगर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज कपूर पुण्यतिथी:शोमन राज कपूर यांनी या स्टार्सचे करिअर उजळवले