Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shatrunjay Parvat जगातील सर्वात अनोखा पर्वत जिथे ८०० हून अधिक मंदिरे आहे

Shatrunjaya Parbat
, रविवार, 1 जून 2025 (07:30 IST)
India Tourism : जगात अनेक पर्यटनस्थळे आहे. सर्व पर्ययटनस्थळाची आपली काही खास विशेतः आहे. तसेच जगात अनेक चमत्कारिक ठिकाणे आहे. जिथे अध्यात्म, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा संगम दर्शविणारी काही ठिकाणे आहे. भारतात असाच एक अनोखा पर्वत असा आहे जिथे एक-दोन नव्हे तर ८०० हून अधिक मंदिरे एका उंचीवर वसलेली आहे. हे मंदिर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. व तो पर्वत म्हणजे शत्रुंजय पर्वत होय. तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकतात. 
भारतात स्थित शत्रुंजय पर्वत हा अनेक लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या ठिकाणाची खास गोष्ट म्हणजे येथे असलेल्या पर्वतावर अनेक मंदिरे बांधलेली आहे. हे ठिकाण इतरत्र कुठेही नाही तर गुजरातमध्ये असून जिथे तुम्ही दर्शनासाठी देखील जाऊ शकता. भारतात असलेल्या या अनोख्या पर्वताचे नाव शत्रुंजय पर्वत आहे जो पालिताणा शत्रुंजय नदीच्या काठावर आहे. येथे अनेक मंदिरे आहे. इतक्या मंदिरांमुळे हा पर्वत लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. दरवर्षी अनेक भाविक येथे येतात.
गुजरातमधील पवित्र शहर पालिताना येथे असलेला हा पर्वत केवळ तीर्थक्षेत्र नाही तर श्रद्धा आणि स्थापत्यकलेचे एक अद्वितीय उदाहरण आहे. भावनगर जिल्ह्यापासून सुमारे ५० किमी नैऋत्येस हे स्थित आहे. हा पर्वत लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. असे म्हटले जाते की हा एकमेव पर्वत आहे जिथे इतकी मंदिरे बांधली जातात. तसेच  जैन तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांनी या पर्वतावर ध्यान केले होते. याशिवाय त्यांनी येथे त्यांचे पहिले प्रवचन देखील दिले. येथील मुख्य मंदिर अशा उंचीवर आहे जिथे पोहोचण्यासाठी लोकांना ३००० पायऱ्या चढाव्या लागतात.  
 
मंदिराचे वैशिष्ट्य 
शत्रुंजय पर्वतावर असलेली ही मंदिरे संगमरवरी असून त्यांचे सौंदर्य इतर सर्वांपेक्षा वेगळे आहे. ही मंदिरे ११ व्या शतकात बांधली गेली होती. जेव्हा जेव्हा सूर्याची किरणे पडतात तेव्हा हे मंदिर आणखी चमकतात. चंद्रप्रकाशात पाहिले की ते मोत्यासारखे चमकतात .
 
शत्रुंजय पर्वत जावे कसे?
हा पर्वत गुजरातमधील पालिताना येथे आहे. येथे जाण्यासाठी, तुम्ही जवळच्या भावनगर विमानतळावर जाऊ शकता. जिथून हा पर्वत ५१ किमी अंतरावर आहे. याशिवाय, पालिताना रेल्वे स्थानकावरून ट्रेन किंवा टॅक्सीने देखील येथे पोहोचता येते.
ALSO READ: महाराणा प्रताप यांची जन्मभूमी कुंभलगड, राजस्थानमधील दुसरा सर्वात मोठा किल्ला

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई विमानतळावर गायक अदनान सामी संतापले, पोस्टमध्ये त्यांनी या सेवेला लज्जास्पद म्हटले