rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री गुरुदेव दत्त मंदिर माणगाव

Shri Gurudev Dutt Temple Mangaon
, रविवार, 22 जून 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक प्राचीन, अद्भुत मंदिरे आहे तसेच संत महात्मे यांनी लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवला. भक्तिमार्ग दाखवला. महाराष्ट्रातील संतमंडळी पैकी एक होते श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज. ज्यांना टेंबे स्वामी म्हणूनही ओळखले जाते. हे दत्त संप्रदायाचे थोर संत, कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. महाराजांचा जन्म जन्म १३ ऑगस्ट १८५४ रोजी महाराष्ट्रातील कोकण भागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे एका कारहाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. दत्त संप्रदायात त्यांना श्री दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. तसेच २४ जून १९१४ रोजी आषाढ शुक्ल प्रतिपदा, शके १८३६ नर्मदाकिनारी गरुडेश्वर  गुजरात येथे महाराजांनी समाधी घेतली. त्यांनी स्वेच्छेने देहत्याग केला, ज्याला संत परंपरेत सजीव समाधी असे म्हणतात. तसेच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे गाव माणगाव येथील श्री दत्तगुरूंचे मंदिर बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. 
श्री दत्त मंदिर माणगाव 
माणगाव येथील दत्त मंदिर टेंबे स्वामी महाराज यांचा वास्तव्याने पावन झाले आहे. हे मंदिर स्वतः टेंबे स्वामी यांनी गावकऱ्यांच्या मदतीने अतिशय सुंदर असे बांधले होते व दत्त गुरूंची स्थापना केली. व नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत इंदिराबाई होळकर यांनी केला. या मंदीरात दोन लाकडी खांब आहे. हेच दोन लाकडी खांब त्यांनी अभिमंत्रित केले असून, त्यांच्या स्पर्शाने बाधा निवारण होते, अशी श्रद्धा आहे. दत्त माऊलींचे या मंदिरात वास्तव्य असून येथील परिसर खूप पवित्र असून प्रसन्न आणि शांत आहे. या मंदिराच्या परिसरात विहीर देखील आहे. तसेच औदूंबराचे वृक्ष असून त्याखाली  पादुका देखील स्थापित आहे. तसेच या मंदिराच्या परिसरात प्राचीन यक्षिणी मंदिर देखील आहे. तसेच टेंबे स्वामींच्या कार्यामुळे दत्त संप्रदायाला नवजीवन मिळाले. माणगाव येथील दत्त मंदिर आणि गरुडेश्वर येथील समाधी मंदिर ही भक्तांसाठी पवित्र स्थाने आहे. 
तसेच माणगाव येथील दत्त मंदिर हे मंदिर खूप पवित्र मानले जाते. एखाद्या स्थानाचे महत्व निश्चित झाल्यावर ते अधिकच चमत्कारिक आणि अद्भुत बनते. तसेच या श्रीदत्तमंदिराची स्थापना झाल्यापासून अनेक भक्त येथे भेट देण्यासाठी येतात. दत्त मंदिरात दररोज काकड आरती, पूजा नैवेद्य, धुप व शेजारती केली जाते. कोकणातील सौंदर्य, प्रसन्न वातावरण, खळखळणारे समुद्रकिनारे याठिकाणी जर तुम्ही भेट देण्यासाठी जात असला तर माणगाव मधील दत्त गुरूंच्या यामंदिरला नक्की भेट द्या. 
ALSO READ: श्री सद्गुरु शंकर महाराज पुणे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेली आराध्या पटेल 'तू धडकन मैं दिल' या मालिकेत दिसणार