rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री क्षेत्र पंढरपूर मधील या प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या

pandharpur
, रविवार, 29 जून 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : आषाढ महिना लागताच सर्व भक्तांना पंढरपूरच्या श्री विठुरायाच्या भेटीची ओढ लागते. अनेक भाविक एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये दाखल होतात. तसेच तुम्हाला देखील पंढरपूरला भेट द्यायची असेल ना. विठ्ठलाच्या मंदिराला भेट दिल्यानंतर तुम्ही पंढरपुर मधील काही पर्यटन स्थळांना देखील भेट देऊ शकतात. तर चला जाणून घेऊ या पंढरपूर मधील काही पर्यटनस्थळे जे खूप सुंदर आहे. 
विठ्ठल रुक्मिणी मंदिर 
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. भीमा म्हणजेच चंद्रभागा नदीच्या किनारी वसलेले हे गाव विठूरायाची पांढरी म्हणून देखील ओळखले जाते. पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रखुमाईचे प्राचीन मंदिर आहे हे मंदिर श्री विठ्ठलाचे मुख्य मंदिर आहे. दरवर्षी आषाढी निमित्त लाखो भक्त या मंदिराला भेट देतात. व विठुरायाचे दर्शन घेतात श्री विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्णाचे अवतार होय. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. तसेच पंढरपूरच्या या मंदिरात भगवान श्रीकृष्णाची श्री विठ्ठल रूपात पूजा केली जाते. हे मंदिर प्राचीन असून याची स्थापना ११ व्या शतकात करण्यात आली आहे. मुख्य मंदिर १२ व्या शतकात देवगिरीच्या यादव शासकांनी बांधले होते. श्री क्षेत्र पंढरपूर भक्ती पंथाला समर्पित मराठी कवी संतांची भूमी देखील आहे. जवळजवळ १००० वर्षे जुनी पायावरी परंपरा महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध संतांनी सुरू केली होती. त्यांच्या अनुयायांना वारकरी म्हणतात ज्यांनी ही प्रथा जिवंत ठेवली.
 
श्री पुंडलिक मंदिर 
तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर श्री विठ्ठलाचे परम भक्त पुंडलिक यांच्या मंदिराला देखील भेट देऊ शकतात. पुंडलिक हे खूप मोठे भक्त होते. भक्त पुंडलिकाचे सुंदर असे मंदिर भीमा नदीच्या म्हणजेच चंद्रभागा नदीच्या किनार्यावर स्थापीत आहे. तसेच भक्त पुंडलिकाचे मंदिर हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ स्थित आहे. पुंडलिकाच्या मंदिराची वास्तू अगदी श्री विठ्ठल मंदिरासारखी असून मंदिरात सुंदर कोरीवकाम आणि शिल्पे कोरलेली आहे. तेव्हा पंढरपूर मध्ये गेल्यानंतर या महान भक्त पुंडलिकाच्या मंदिराला नक्की भेट द्या. 
 
चंद्रभागा नदी 
चंद्रभागा नदी म्हणजेच जिला भीमा नदी देखील म्हणतात. अनेक संतांच्या अभंगांमध्ये या भीमा नदीच्या अर्थात चंद्रभागा नदीचा उल्लेख आढळतो. श्री क्षेत्र पंढरपूर याच नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. तसेच भीमा नदी ही पंढरपूमध्ये चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून चंद्रभागा असे देखील म्हणतात. ही नदी वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते व या नदीला खूप पवित्र मानले गेले आहे. 'जेव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा, तेंव्हा होती चंद्रभागा' चंद्रभागेबाबत असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. तसेच भीमा नदीला इतिहास देखील लाभलेला आहे म्हणून ती ऐतिहासिक दृष्टीने देखील महत्वाची असून या नदीमध्ये तुम्ही बोटीचा देखील आनंद घेऊ शकतात. 

श्री कृष्ण इस्कॉन मंदिर 
पंढरपूर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनेक सुंदर प्राचीन मंदिरे, वास्तू पाहावयास मिळतील श्री विठ्ठल मंदिरापासून काही अंतरावर श्री कृष्ण इस्कॉन मंदिर असून हे मंदिर या पंढरपूर मधील प्रसिद्ध मंदिर आहे, हे मंदिर अतिशय सुंदर असून येथील प्रसन्नता आणि शांतता मनाला खूप भावते इस्कॉन मंदिर येथे अनेक पर्यटकांना आकर्षित करते व त्याला श्री श्री राधा पंढ रीनाथ मंदिर देखील म्हणतात. तसेच या मंदिराची स्थापना इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना द्वारे करण्यात आली आहे तेव्हा इथे नक्कीच भेट द्या.  
 
तुळशी वृंदावन 
सोलापूर जिल्ह्यातील विठुरायाचे पंढरपूर हे धर्तीवरील वैकुंठ मानले जाते. तसेच आळंदी हे ज्ञानपीठ, कोल्हापूर हे शक्तीपीठ तसे पंढरपूर हे भक्तीपीठ आहे.अनेक संतांनी आपल्या अभंगांमधून पंढरीच्या विठुरायाचे, चंद्रभागा नदीचे महत्त्व सांगितले आहे. तसेच पंढरपूमध्ये साधारण इ.स. १८७४ मध्ये एका ओढ्याला अडवून तलाव तयार केला आहे. हा तलाव यमाई तलाव म्हणून देखील ओळखला जातो. यामध्ये आता तुळशी वृंदावन उद्यानाची निर्मिती करण्यात आहे. तसेच या उद्यानात विठूरायाची भव्य अशी मूर्ती स्थापित आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती, पक्षी, जलचर प्राणी देखील पाहावयास मिळतात. या उद्यानातील एक आकर्षण म्हणजे श्री यंत्राची रचना होय. श्री यंत्र हे त्रिपुरा शक्तीचे प्रतीक असून हे यंत्र भगवती, श्रीविद्या व त्रिपूरा सुंदरीच्या साधनेमध्ये अत्यंत प्रभावी मानले जाते. समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या या यंत्रामध्ये ३३ कोटी देवांचा वास असल्याचे सांगितले जाते. अशा या यंत्राची प्रतिकृती पंढरपूमधील तुळशी वृंदावनामध्ये करण्यात आलेली आहे.   
 
चंद्रभागा मंदिर
पंढरपूरमध्ये गेल्यावर चंद्रभागा मंदिराला अवश्य भेट द्या चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर स्थापित चंद्रभागा मंदिराला कमीतकमी २१० वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेला आहे. व चोपडेकर महाराज यांनी चंद्रभागेचे मंदिर बांधून चंद्रभागा घाटाची उभारणी केली होती. भक्तांसाठी जसा पंढरपूरचा विठुराया तशीच चंद्रभागा मंदिर होय पंढरपूरला आल्यानंतर लाखो विठ्ठल भक्त प्रथम पवित्र चंद्रभागेत स्नान करतात आणि मग विठूमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात.   
 
संत कैकाडी महाराज मठ
संत कैकाडी महाराज यांचा मठ हा पंढरपूर शहराच्या उत्तरेस स्थापित आहे. या ठिकणी अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटते या मठामध्ये सर्व देवतांचे व संतांचे दर्शन घडते. हा मठ अतिशय सुंदर बांधण्यात आला असून खूप मोठ्या परिसरात याचे बांधकाम करण्यात आले आहे. पंढरपूर मध्ये गेल्यानंतर या संत कैकाडी महाराज मठाला नक्की भेट द्या.  
 
संत तनपुरे महाराज मठ
पंढरपूरमध्ये गुजराती समाजचे देवस्थान संत तनपुरे महाराज मठ देखील स्थापित आहे हा मठ चंद्रभागेच्या पलीकडच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. संत तनपुरे महाराज यांच्या मठात दर्शनासाठी जाण्यासाठी नदीमधून नाव करून जावे लागते. तुम्ही देखील या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकतात.  
 
पंढरपूरला जावे कसे? 
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून येथे जाण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहे. सोलापूर जिल्हा अनेक मार्गांना जोडला गेला आहे.  
रस्ता मार्ग- महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांशी पंढरपूर रस्ता मार्गाने जोडलेले आहे. तसेच कर्नाटक,  आंध्र प्रदेशातून देखील पंढरपूरला बसेस धावतात.
रेल्वे मार्ग- पुणे-मुंबई वरून अनेक रेल्वे गाड्या पंढरपूरला धावतात.  
विमान मार्ग - पंढरपूरपासून सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे, जे २४५ किमी अंतरावर आहे. विमातळावर उतरल्यानंतर खासगी वाहन किंवा बस मदतीने तुम्ही नक्कीच पंढरपूरमध्ये पोहचू शकतात. 
ALSO READ: संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'द फॅमिली मॅन ३' चा टीझर प्रदर्शित, मनोज बाजपेयी पुन्हा एकदा नवीन मोहिमेवर परतणार