Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुठे आहे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर? दर्शन घेतल्यास कर्जमुक्तीचा मार्ग उघडतो

Mahadev Temple Omkareshwar
, बुधवार, 25 जून 2025 (07:30 IST)
दैनंदिन जीवनात प्रत्येकाला समस्या असतात. तसेच प्रत्येकजण आपापल्या समस्यांशी लढत असतो. कोणाला यश येते तर कुणाला नैराश्य. अनेक वेळेस कर्ज घेऊन आपण ते फेडू शकत नाही. खूप समस्या येतात अश्यावेळेस सर्व मार्ग बंद झालेले दिसतात. पण आज आपण अश्या एका मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे दर्शन केल्याने, पूजा केल्याने कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतात. तसेच तुम्ही देखील कर्जाने वेढलेले असाल आणि ते परत करायचे असेल, तर असे म्हटले जाते की तुम्ही ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात जाऊन त्यांची पूजा करावी आणि ऋणमुक्तेश्वर मंत्राचा जप करावा. असे केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग उघडतो. ऋणमुक्तेश्वर महादेवाचे मंदिर कुठे आहे आणि त्यांची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया.
 
webdunia
ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर
दोन ठिकाणी ऋणमुक्तेश्वर महादेवाची मंदिरे आहे. पहिले कुंभ नगरी उज्जैनमध्ये आहे आणि दुसरे तीर्थक्षेत्र ओंकारेश्वरमध्ये आहे. हे दोन्ही शहर मध्य प्रदेशमध्ये स्थित आज. उज्जैनचे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर शहरापासून सुमारे १ किमी अंतरावर क्षिप्रा नदीच्या काठावर वाल्मिकी धाम परिसरात आहे. तर ओंकारेश्वरमध्ये, माँ नर्मदा आणि कावेरीच्या संगमाजवळ, ऋणमुक्तेश्वर महादेवाचे सिद्धलिंग आहे, जे ओंकारेश्वर पर्वत परिक्रमा मार्गावर येते. 
पूजा कशी करावी 
१. जर तुम्ही उज्जैनमधील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात गेलात तर पुजारी तेथे पूजा करतात. येथे शनिवारी पूजा केली जाते, ज्याला 'पिवळी पूजा' म्हणतात. येथे पिवळी पूजा करणारा व्यक्ती लवकरच कर्जमुक्त होतो.
 
२. पिवळी पूजामध्ये, सर्व वस्तू पिवळ्या रंगाच्या असतात ज्या महादेवाला अर्पण केल्या जातात. जसे की पिवळे कपडे, हरभरा डाळ, मसूर, हळदीची गाठ, पिवळी फुले, थोडा गूळ इत्यादी वस्तू बांधून आपल्या इच्छेनुसार जलधारीवर अर्पण कराव्या लागतात. अशीच पूजा ओंकारेश्वरमध्ये देखील केली जाते.
 
३. असे म्हटले जाते की सतयुगात राजा हरिश्चंद्रांनी ऋणमुक्तेश्वर महादेवाची पूजा केली होती, तेव्हाच त्यांना कर्जमुक्ती मिळाली. त्यांना ऋषी विश्वामित्रांना गेंड्याच्या वजनाइतके सोने दान करावे लागले, म्हणून त्यांनी शिप्राच्या काठावर ऋणमुक्तेश्वर महादेवाची पूजा केली.
 
पूजेचा मंत्र 
'ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः' असा जप करताना पिवळ्या वस्तू अर्पण करा.
 
ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराचे महत्त्व
कर्जातून मुक्तता - कर्जबाजारी असलेले लोक येथे येऊन भगवान शिवाची पूजा करून कर्जातून मुक्तता मिळवू शकतात.
 
आर्थिक समृद्धी - हे मंदिर व्यापारी आणि कष्टकरी लोकांसाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते.
 
नकारात्मक ऊर्जा आणि अडथळ्यांचा नाश - शिवलिंगावर विशेष अनुष्ठान केल्याने जीवनातील आर्थिक आणि मानसिक अडथळे दूर होतात.

ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर जावे कसे?
मध्य प्रदेशमध्ये उज्जैन आणि ओंकारेश्वर हे प्रमुख तीर्थक्षेत्रे असून याठिकाणी जाण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहे. खासगी बस, विमान सेवा, तसेच रेल्वे सेवा देखील उपलब्ध आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विनोदवीर अशोक सराफ यांची संपूर्ण माहिती