rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आषाढी एकादशीला पंढरपूर जाणे शक्य नसेल तर या मंदिरात दर्शन घ्या

Pratipandharpur Vitthal Temple
, मंगळवार, 24 जून 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी असून या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल होतात व विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात पण अनेकांना पंढरपूर येथे जाणे जमत नाही. याकरिता आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिरे जे प्रतिपंढरपूर म्हणून देखील ओळखले जाते तुम्हाला आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे जमले नाही तर तुम्ही या मंदिरांमध्ये जाऊन नक्कीच श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतात. तर चला जाणून घेऊन श्री विठ्ठल मंदिरांबद्दल जिथे तुम्ही नक्कीच जाऊ शकतात.   
 
श्री विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी पुणे 
महाराष्ट्रातील पुणे हे प्रमुख शहर असून ऐतिहासिकदृष्ट्या पुणे शहराला खूप महत्व आहे कारण पुण्यामध्ये ऐहासिक प्राचीन वाडे, मंदिरे देखील आहे. तसेच पुण्यातील सिंहगड रोड वर प्राचीन श्री विठ्ठल मंदिर आहे ज्याला प्रतिपंढरपूर असेही ओळखतात. या मंदिरात जातांना विठ्ठलवाडीची कमान लागते म्हणून या मंदिराला क्षेत्र विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी नावाने ओळखतात. मुळा मुठा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर १७५ वर्ष जुने असून खूप सुंदर आणि शांत परिसरात आहे. याठिकाणी तुम्ही नक्कीच दर्शनाला जाऊ शकतात.  
 
श्री विठ्ठल मंदिर दौंड पुणे
प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले श्री विठ्ठल मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या दौंडमध्ये स्थापित आहे. या प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिरात रुक्मिणीसह विठ्ठलाची मूर्ती स्थापित आहे. रुक्मिणीसह विठ्ठलाची मूर्ती इतर विठ्ठलाच्या मंदिरांमध्ये क्वचितच आढळतात. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर असून  पांडवांचे कुलपुरोहित धौम्य ऋषींनी यांनी या मंदिराची उभारणी केली होती. तसेच या मंदिराचे बांधकाम  हेमाडपंथी प्रकारातील असून दगडांमध्ये बांधले आहे. याठिकाणी तुम्ही आषाढी एकादशी नक्कीच दर्शनाला जाऊ शकतात.  
 
श्री विठ्ठल मंदिर नंदवाळ कोल्हापुर
महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्ह्यात नंदवाळ गाव असून या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिर आहे. तसेच हेमाडपंती दगडी बांधकामात हे मंदिर आहे. या मंदिराची अशी आख्ययिका आहे की या ठिकाणी श्री विठ्ठल रोज रात्री वस्तीस असतात याकरिता हे मंदिर प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच नंदवाळ गावाला प्रति पंढरपूर म्‍हणून देखील ओळखले जाते. तसेच येथील श्री विठ्ठलाचे मंदिर हे अतिशय प्राचीन व प्रसिध्द आहे. या मंदिरात श्री विठ्ठल, सत्‍यभामा, रुख्मिणी अशा तीन स्वयंभू मूर्ती एकत्र असून या मंदिराला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे.
  
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर औंढ  
महाराष्ट्रातील औंढ येथील मुळा-मुठा नदीच्या काठावर बांधलेले श्री विठ्ठल रूक्मिणीचे मंदिर हे २८५ वर्षांपूर्वी बांधले गेले असून हे मंदिर खूप सुंदर असून शांत आणि रमणीय परिसरासाठी प्रसिद्ध आहे. आषाढी एकादशी निमित्त तुम्ही या मंदिराला नक्कीच दर्शनाला जाऊ शकतात. 
 
श्री विठ्ठल मंदिर कौंडिण्यपूर अमरावती 
महाराष्ट्रातील विदर्भातील प्रमुख शहर अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. याला विदर्भाचे पंढरपूर देखील म्हणतात वर्धा नदीच्या काठावर स्थापित हे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर अतिशय सुंदर बांधले आहे. या मंदिराला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. आषाढी एकादशी निमित्त तुम्ही येथे नक्कीच दर्शनाला जाऊ शकतात 
श्री विठ्ठल मंदिर सायन मुंबई 
महाराष्ट्रातील मुंबईतील सायन परिसरातील सुंदर असे श्री विठ्ठल मंदिर असून १८९३ साली या मंदिरात श्री श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती स्थापित करण्यात आली. तसेच हे मंदिर १२५ वर्ष जुने ओळखले जाते यामंदिराला देखील प्राचीन इतिहास लाभला आहे अनेक भक्त मुंबईतील या मंदिरात दर्शनासाठी येत असतात तुम्ही देखील आषाढी एकादशीला या मंदिरात जाऊन विठू माउलीचे दर्शन नक्कीच घेऊ शकतात.  
श्री विठ्ठल मंदिर दहिवली कर्जत 
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरातील दहिवली येथील प्राचीन विठ्ठल मंदिर असून याला मंदिराला तटबंदी आहे. तसेच या मंदिरात दोन शिलालेख आढळले आहे हे उल्हास नदीच्या काठावर वसलेले आहे. दहिवली येथील श्री विठ्ठल मंदिराला चहुबाजूंनी तटबंदी आहे व मंदिरात प्रवेश करण्यासाठी भव्य असे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर नगारखाना असून दीपमाळ देखील आहे. या मंदिरात अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात तुम्ही देखील आषाढी एकादशीला या मंदिरात नक्कीच दर्शनाला जाऊ शकतात.  
ALSO READ: संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळाला