राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी पक्षांतर करत असताना यात माजी खा. उदययन राजे भोसले यांनी सुद्धा भाजपात पक्ष प्रवेश केला. मात्र राजे जरी गेले तरी प्रजा आमच्या सोबतच असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतल्यावर भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले. आजवर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राहीले आहे. त्यामुळे लोक कोणाच्या बाजूला झुकलेले असतात हे पाहण गरजेच आहे असे म्हणत भुजबळ यांनी चिमटा काढला.