नाशिक आणि अहमदनगर येथे झालेल्या व सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पुढील जिल्ह्यांसाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे दुष्काळी आणि तहानलेल्या जिल्ह्यांना फार मोठा फायदा होणार आहे.
आपल्या देशासह आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असणारं जायकवाडी धरण आता पूर्ण भरलं आहे. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे.
मराठवाड्यातील प्रमुख शहर आणि राजधानी असलेलं औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे. मराठवाड्यातील सुमारे 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक येथे पाऊस सुरू असल्याने येथील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्याचा मोठा फायदा जयकवडीस होतो आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा, बीड, परभणी, नांदेड या भागातील नागरिकांना फायदा होणार आहेजायकवाडीच्या उजव्या कालव्यातून 700 क्युसेस तर डाव्या कालव्यातून 400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.