Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

युतीच्या जागा वाटप नाहीत मात्र या इच्छुक उमेदवाराने सुरु केला प्रचार

silip sopal
, सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:07 IST)
सोलापूरच्या बार्शीत हा प्रकार घडला असून, बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून दिलीप सोपल यांनी उमेदवारी जाहीर न होताच निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. सोपलांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता, शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून येईल, अशी भीती वर्तवणारे शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकरांनी सोपलांना या ठिकाणी  जाहीर पाठिंबा दिला. एव्हडेच नाही तर सोपलांनी उमेदवारी आगोदरच प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ करावा असा आग्रहही धरला आहे.
 
शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर दहा वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना बार्शीच्या तळागाळात रुजविण्याचे काम आंधळकर यांनी केले होता, या निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता होती, राष्ठ्रवादीच्या दिलीप सोपलांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवबंधन बांधून घेतलं. सोपलांच्या राष्ट्रवादी सोडल्याने बार्शीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला, त्यामुळे  शिवसेनेतही अंतर्गत वाद उफाळून आला. त्या ठिकाणी बंडाची भाषा करण्यात आली. यासर्वांमध्ये भाऊसाहेब आंधळकर हे आघाडीवर होते. मात्र, त्याच आंधळकरांनी आता थेट दिलीप सोपलांच्या मागे राहू, असं सांगत प्रचाराचा नारळ फोडण्याचा आग्रह केला आणि सोपलांनी तो पूर्णही केला आहे. मात्र अजूनही शिवसेना आणि भाजपाच्या जागा वाटप झाल्या नाहीत त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे नक्की नाही, मात्र उमेदवारी न मिळताच प्रचार करणे हा चर्चेचा विषय झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, पक्ष चालवत येत नाही ते देश काय चालवणार