Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सत्ताधारी पक्षावर वचक ठेवायला सक्षम विरोधी पक्ष मी देणार – राज ठाकरे

सत्ताधारी पक्षावर वचक ठेवायला सक्षम विरोधी पक्ष मी देणार – राज ठाकरे
राज ठाकरे यांची पुणे येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेना, भाजपवर जोरदार टीका केली. तर ज्या शेतकऱ्याने आत्महत्या करतांना सत्तधारी पक्षाचे टी शर्ट घातले त्याची पुन्हा सर्वाना आठवण करवून दिली, राज म्हणाले की या सत्ता असलेल्या पक्षावर जर नियंत्रण हवे तर सक्षम विरोधी पक्ष हवा असून, तो मीच देवू शकतो, सरकारला तुमच्या वतीने जाब विचारणारा कोणीतरी हवा आहे, ते काम माझे निवडणून गेलेले आमदार करतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले
 
राज ठाकरे काय म्हणाले मुख्य मुद्दे :
 
• महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचा एक मंत्रीच पुण्यात वाहत आला.
 
• सव्वाशे वर्ष मराठेशाहीने ह्या संपूर्ण भूप्रदेशावर राज्य केलं होतं, पाकिस्तानच्या अटक किल्ल्यापर्यंत भगवा फडकावला होता पण तरीही आपला हा जाज्वल्य इतिहास पोहचवला जात नाही. त्या वैभवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार सरकारने करायचा असतो. पण हे सरकार पुतळ्यांची स्मारकं करण्याच्या घोषणेत मश्गुल.
 
• अमोल यादव नावाच्या एका मराठी अभियंत्याने विमान बनवलं. नंतर त्याने तो प्रकल्प मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं गेलं कि 'ठाणे जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देतो.' अनेक हेलपाटे घातले पण त्या तरुणाला जमीन मिळाली नाही. अखेर तो मुलगा सरकारी दिरंगाईला कंटाळून अमेरिकेत गेला. तिथे त्याला जागाही मिळाली आणि गुंतवणूकही मिळाली. हेच तुमचं 'मेक इन महाराष्ट्र' का?
 
• आपला यवतमाळ जिल्हा. कशासाठी देशभर चर्चेत आहे तर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणार जिल्हा. ही आपल्या महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्याची ख्याती.
 
• अमित शहा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात '३७० कलम' बद्दल भाषण देत होते आणि नजीकच्या गावातच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. परवा दिवशी मुख्यमंत्र्यांचं जिथे भाषण होणार होतं त्या गावात एक ३५ वर्षीय शेतकऱ्याने भाजपचं 'येणार तर आपलंच सरकार' लिहिलेलं टी-शर्ट घालून आत्महत्या केली.
 
• ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे कि, 'माझी नोकरी कधीही जाऊ शकते'. ह्याचं कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेली भीषण आर्थिक मंदी.
 
• बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो.
 
• सरकारने घोषणा केली होती कि '१०० स्मार्टसिटी घडवणार'. काय झालं त्या योजनेचं? शहरात भरलेलं पाणी म्हणजे स्मार्ट सिटी का? कि वाहतूक कोंडी आणि खड्डे पडलेले रस्ते म्हणजे स्मार्ट सिटी?
 
• ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेच आज भाजपात गेले आहेत. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही भाजपात गेला. म्हणजे इथूनही तेच राज्य करणार तिथूनही तेच राज्य करणार. ही तुमच्याशी प्रतारणा नाही का?
 
• पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते हि हतबलता.
 
• आम्हाला विरोधासाठी विरोध करणारा 'विरोधी पक्ष' व्हायचं नाही. सरकारने एखादं चांगलं काम केलं तर खुल्या मनाने अभिनंदन करू पण जनतेवर अन्याय करायचा प्रयत्न झाला तर निडरपणाने सरकारला धारेवर धरू.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रथमच निवडणुकांचे होणार लाइव्ह वेबकास्ट