rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका ट्वीटने केली ज्योतिरादित्य शिंदेची फजिती

Jyotiraditya Shinde's fajitis made by a tweet
, शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (10:05 IST)
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची मुले म्हणजेच धीरज तसेच अमित देशमुख हे विजयी झाले आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक ट्वीट केलं आहे. आडनाव जरी मराठी असलं तरी ज्योतिरादित्य यांना मराठी नीट लिहिता येत नाही. तरीही मराठीतून देशमुख बंधूंचे मराठीतून अभिनंदन करण्याचा शिंदे यांनी प्रयत्न केला. बहुधा त्यांनी गुगल ट्रान्सलेटरचा आधार घेतला, 
 
या ट्वीटच्या पहिल्या वाक्यामध्ये शिंदे यांनी धीरज आणि अमित देशमुख यांचा उल्लेख करताना पुल्लिंगाच्या जागी स्त्रीलिंग करून टाकलं आहे. शेवटच्या वाक्याबाबत बोलायचे झाले तर ते वाचून ‘अरे कहना क्या चाहते हो!’ असा वाचकांना प्रश्न पडला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे हे ट्वीट पाहिल्यानंतर काहींनी मराठीतून ट्वीट केल्याबद्दल कौतुक केले. तर उत्तम मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी शिंदे यांना झोडपून काढले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय भावाशी पराभूत होऊन रडू लागली पंकजा मुंडे... जाणून घ्या व्हायरल फोटोबद्दल सत्य...