Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोशल मीडियावर युद्ध, आता 'MahaMandateWithModi' चा ट्रेण्ड सुरु

सोशल मीडियावर युद्ध, आता 'MahaMandateWithModi' चा ट्रेण्ड सुरु
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील महाराष्ट्रात प्रचार करत  आहेत. मात्र वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सोशल मीडियावर नागरिक सत्ताधाऱ्यांबद्दल आपला राग व्यक्त करत आहेत. त्यामुळेच ट्विटरवर #मोदी_परत_जा असा मराठी हॅशटॅग ट्रेन्डिंगवर दिसतोय.
 
महाराष्ट्राच्या खर्चानं गुजरातच्या आर्थिक केंद्राचे महत्त्व वाढवणारी बुलेट ट्रेन काशाला? घसरत चाललेल्या आर्थिक परिस्थितीचं काय? नोकऱ्यांचं काय? महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांचं काय? मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी 'आरे'सारख्या पर्यावरणाच्या हानीचं काय? केवळ पंतप्रधानांना पत्रं लिहिलं म्हणून सहा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली... आम्हाला हुकूमशाह नकोय, असं म्हणत आणि वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत नेटकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. 
 
दुसरीकडे, भाजपनेही मोदी परत जा या हॅशटॅगला जोरदार उत्तर देत 'MahaMandateWithModi' हा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. याद्वारे सरकारने केलेली कामं सांगत विरोधकांवर पलटवार केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मग 'आरे' त गवत लावून जंगल घोषित करणार का? राज यांचा सवाल