Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची संपत्तीत वाढ, काय आहे कारण ?

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची संपत्तीत वाढ, काय आहे कारण ?
, शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (12:04 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील दक्षिण-पश्चिम नागपूरमधून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी हा अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी एकूण संपत्ती 3.78 कोटी रुपये नमूद केली आहे. तर विशेष म्हणजे 2014 मध्ये त्यांची मालमत्ता 1.81 कोटी इतकी होती, मात्संर दुप्पपट संपत्त्तीती कशी काय वाढली त्याचंही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडून दिले आहे. जमिनींच्या बाजारमूल्यात गेल्या पाच वर्षांत झालेल्या वाढीमुळे स्थावर मालमत्तेत वाढ झाली असल्याचं स्पष्ट केले आहे. 
 
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची स्थावर मालमत्ता 2014 ला 42.60 लाख होती, जी आता 99.03 लाख रूपये 
मुख्यमंत्र्यांकडे 2014 मध्ये 50 हजार रूपये रोख रक्कम होती, ती आता 17,500 रूपये 
बँकेतील ठेवी 2014 मध्ये 1,19,630 रूपयांच्या होत्या, ज्या 8,29,665 रूपये 
अमृता फडणवीस यांच्याकडे 2014 मध्ये रोख रक्कम 20 हजार रूपये होती, ती आता 12,500 रूपये 
बँकेत ठेवी 1,00,881 रूपये इतक्या होत्या, त्या आता 3,37,025 रूपये 
2014 मधील 1.66 कोटी रूपयांच्या शेअर्सचं मूल्य आता 2019 मध्ये 2.33 कोटी रूपये आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ईडी कारवाई केलेले भुजबळ यांची संपत्ती नेमकी आहे तरी किती ?