Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

१९ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशकात सभा, १८ ला मुख्यमंत्र्यांच्या महाजानादेश यात्रेचा रोडशो

१९ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशकात सभा, १८ ला मुख्यमंत्र्यांच्या महाजानादेश यात्रेचा रोडशो
नाशकात १९ सप्टेंबरला महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्या निमित्ताने त्यादिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोडशो देखील होणार आहे. नरेंद्र मोदी यांची तपोवनात होणाऱ्या जाहीर सभेची नियोजन बैठक भाजपच्या नाशिक येथील वसंतस्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
 
हि नियोजन बैठक शहराध्यक्ष गिरीष पालवे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी,आ.बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, सुहास फरांदे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी संदीप जाधव, विक्रम नागरे यांच्या उपस्थिती पार पडली. यावेळी आमदार सानप म्हणाले की,  मुख्यमंत्र्यांच्या रोडशोमध्ये किमान 15 हजार पदाधिकारी, कार्यकर्ते अग्रभागी असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेस 5000बाईक रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे अशी माहिती शहराध्यक्ष गिरीष पालवे दिली आहे.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष गिरीश पालवे हे होते, यावेळी सभेच्या नियोजनासाठी विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. तसेच जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले. मुख्यमंत्री नाशकात नागरिकांना भेटण्यास येत आहेत त्यानंतर पंतप्रधानांची होणारी सभा म्हणजे नाशिककरांसाठी एकप्रकारे हा दुग्धशर्करा योग आहे, मुख्यमंत्र्यांचा रोडशो आणि पंतप्रधानांची सभा यांचे नियोजन चांगले व्हावे,भाजपाची वज्रमुठ त्याद्वारे दिसावी, नाशिकच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन त्याद्वारे घडावे, असे भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमोल मुझुमदार: आचरेकर सरांचा विद्यार्थी ते दक्षिण अफ्रिकेचा बॅटिंग कोच