यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे तत्त्वावर देण्याबाबत समर्थन केले आहे. उदयनराजे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाडे तत्त्वावर देण्यात चुकीचे काय? असे म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी हे देखील सांगितले की, लग्नसमारंभांसाठी गडकिल्ले भाडे तत्त्वावर देण्यात काही चुकीचे वाटत नाही. 
 
सरकारच्या याबाबतच्या धोरणाला माध्यमांकडून चुकीचे वळण देण्यात आले आहे. मी स्वतः पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली असून, मला त्यांनी सरकारचे याबाबतचे धोरण पूर्णपणे समजावून सांगितले आहे. सरकारच्या धोरणात गडकिल्ल्यांचा काही भाग लग्नसमारंभांसाठी भाडे तत्त्वावर देण्याबाबत म्हटले गेले आहे. त्यामुळे यामध्ये मला तरी काही चुकीचे वाटत नाही. आपण देवळात लग्न लावत नाहीत का? असा प्रश्न करत गडकिल्ले भाडे तत्त्वावर दिल्यास आपल्याच देशाची अर्थव्यवस्था सुधारेन असेही ते म्हणाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त