Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेच्या मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत

शिवसेनेच्या  मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत
, बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (15:18 IST)
राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नाहीच, राज्यात ते राज्य करु शकत नाहीत असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले  आहे. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना १०० चा आकडा पार करेल असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सोबतच महायुती २०० चा आकडा पार करेल असा दावाही त्यांनी केला आहे. राऊत पुढे म्हणाले की महायुती २०० च्या वर जाणार हे सांगायला कोणत्याही पोल किंवा ज्योतिषाची गरज नाही.
 
आम्ही राज्यात १२४ जागा लढत असून प्रत्येक जागा ही जिंकण्यासाठीच असते असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “२०१४ साली कोणतीही युती नसताना आम्ही निवडणूक लढली होती. ‘तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना’ ही म्हण राजकारणात योग्य ठरते. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाला एकमेकांशिवाय पर्याय उरलेला नाही. शिवसेनेशिवाय भाजपा सत्तेत येवूच शकणार राज्य करु शकत नाही. भाजपाला जास्त जागा मिळतील हे मान्य करायला काही करत नाही. पण जागा जास्त मिळाल्या तरी तरी महाराष्ट्रात शिवसेनेचं महत्त्व कमी होणार नाही असं संजय राऊत यांनी सांगितले आहे. 
 
भाजपला बहुमत मिळाल्यास काय कराल असे राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की, युतीला बहुमत मिळेल असं सावध उत्तर राऊत यांनी दिलं. भाजपला चांगल्या जागा मिळतील. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना शंभरहून अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यापेक्षा जास्त मिळाव्या असा त्यांचा प्रयत्न करणार आहेत. शेवटी सत्ताधाऱ्यांकडं जी काही साधनं असतात त्याचा फायदा मिळतोच, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच