rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चमत्कारी परिणामासाठी शिवलिंगावर या प्रकारे करा रुद्राभिषेक

Importance of rudrabhishek
रुद्र अर्थात भूतभावन शिवाचं अभिषेक. शिव आणि रुद्र एकमेकाचे समानार्थी आहे. शिवाला 'रुद्र' असे म्हटले गेले आहे कारण रुतम्-दु:खम्, द्रावयति-नाशयतीतिरुद्र: अर्थात महादेव सर्वांचे दुःख नष्ट करणारे देव आहे.

रुद्राभिषेक केल्याने आमच्या कुंडलीतील महापाप देखील जळून भस्म होतात आणि आमच्यात शिवत्वाचं उदय होतं. महादेवाचा शुभाशीर्वाद प्राप्त होतं. सर्व कामना पूर्ण होतात. एकमात्र सदाशिव रुद्राचे पूजन केल्याने सर्व देवतांची पूजा होते आणि रुद्राभिषेक पूजनाचे विभिन्न लाभ या प्रकारे आहेत.
 
• पाण्याने अभिषेक केल्याने पाऊस पडतो.
• असाध्य आजारापासून मुक्तीसाठी कुशोदकाने रुद्राभिषेक करावे.
• भवन-वाहनासाठी दह्याने रुद्राभिषेक करावे.
• लक्ष्मी प्राप्तीसाठी उसाच्या रसाने रुद्राभिषेक करावे.
• धनवृद्धीसाठी मध आणि तुपाने अभिषेक करावे.
• तीर्थ जलाने अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्ती होते.
• अत्तर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक केल्याने आजार दूर होतात.
• संतान प्राप्तीसाठी दुधाने अभिषेक करावा.
• रुद्राभिषेक केल्याने योग्य व विद्वान संतान प्राप्ती होते.
• ज्वर शांती हेतू गार पाणी किंवा गंगाजलाने रुद्राभिषेक करावे.
• सहस्रनाम मंत्र उच्चारण करत तुपाच्या धारीने रुद्राभिषेक केल्याने वंश वाढतं.
• गोनोरिया आजारापासून मुक्तीसाठी दुग्धाभिषेक केलं जातं.
• गोड दुधाने अभिषेक केल्याने मूर्ख देखील विद्वान होतो. 
• मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्याने शत्रू पराजित होतात.
• मधाने अभिषेक केल्याने क्षय रोग दूर होतो.
• पाप नष्ट करण्याची कामना करत मधाने रुद्राभिषेक करावे.
• गायीच्या दुधाने आणि शुद्ध तुपाने अभिषेक केल्याने निरोगी काया प्राप्त होते.
• संतान प्राप्तीसाठी साखर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावे. 
 
असं तर अभिषेक साध्या पाण्याने केलं जातं परंतू विशेष अवसर किंवा सोमवार, प्रदोष आणि शिवरात्री सारख्या दिवशी मंत्र, गोदुग्ध किंवा इतर दुधाने अभिषेक केलं जातं. विशेष पूजनेत दूध, दही, तूप, मध आणि साखर मिसळून अर्थात पंचामृताने अभिषेक केलं जातं. 
 
तंत्रात रोग निवारण हेतू विभिन्न वस्तूने अभिषेक केलं जाण्याचे विधान आहे. या प्रकारे विविध द्रव्याने शिवलिंगाचे विधिपूर्वक अभिषेक केल्याने सर्व कामना पूर्ण होतात.
 
यात शंका नाही की नियमित पुजत असलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने फळ प्राप्ती होते परंतू पारद शिवलिंगावर अभिषेक केल्याने लवकरच चमत्कारिक शुभ फळ प्राप्त होतात. त्यातून रुद्राभिषेक केल्याचं फळ अती शीघ्र प्राप्त होण्याची शक्यता असते.
 
कारण स्वयं सृष्टीकरता ब्रह्मा यांनी देखील म्हटले आहे की जेव्हा आम्ही अभिषेक करतो तेव्हा स्वयं महादेव साक्षात अभिषेक ग्रहण करतात. जगात असली कुठली ही इच्छा, सुख, वैभव नाही जी रुद्राभिषेक केल्याने प्राप्त होऊ शकत नाही... 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोमवारची महाशिवरात्री अधिक फळ देणारी