अभिषेक शब्दाचा अर्थ आहे स्नान करणे किंवा स्नान घालणे. रुद्राभिषेक याचा अर्थ आहे भगवान रुद्र यांचा अभिषेक.
महादेवाला रुद्र म्हटले गेले आहे आणि त्यांचं रूप शिवलिंग यात बघायला मिळतं. याचा अर्थ शिवलिंगावर रुद्र मंत्रांद्वारे अभिषेक करणे.
अभिषेकाचे अनेक रूप आणि प्रकार असतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ पद्धत आहे रुद्राभिषेक करणे किंवा श्रेष्ठ ब्राह्मण विद्वान द्वारे अभिषेक करवणे.
आपल्या जटांमध्ये गंगा धारण केल्याने महादेवाला जलधारा प्रिय मानले गेले आहे.
जाणून घ्या आपल्या राशीनुसार कोणत्या प्रकाराचे अभिषेक आपल्यासाठी शुभ ठरेल ते-
1. मेष- मध आणि उसाचा रस
2. वृषभ- दूध आणि दही
3. मिथुन- दूर्वा मिश्रित पाण्याने
4. कर्क- दूध, मध
5. सिंह- मध आणि उसाच्या रसाने
6. कन्या- दूर्वा मिश्रित दह्याने
7. तूळ- दूध आणि दही
8. वृश्चिक- उसाचे रस, मध आणि दूध
9. धनू- दूध आणि मध
10. मकर- गंगा जलमध्ये गूळ घालून गोड पाण्याने
11. कुंभ- दही आणि साखर
12. मीन- दूध, मध आणि उसाच्या रसाने