पत्रकाराचा दावा
नथूराम गोडसे यांनी गोळ्या घातल्या त्यावेळी महात्मा गांधींनी हे राम असे उच्चारले नव्हते, असा दावा आता करण्यात येत आहे.
पत्रकार दयाशंकर शुक्ल ऊर्फ सागर यांनी लिहिलेल्या महात्मा गांधी- ब्रह्मचर्य के प्रयोग या नव्या पुस्तकांत त्यांनी हे म्हटले आहे. गांधीजींनी शेवटच्या क्षणी केवळ हे रा....एवढेच शब्द उच्चारल्याचा दावा त्यांनी गांधीजींची नात मनू यांच्या हवाल्याने केला आहे. गांधीजींना ३० जानेवारी १९४८ रोजी गोळ्या घालणाऱ्या नथूराम गोडसेनेही गांधीजींना हे राम म्हटले नव्हते, असा दावा केला होता. गांधीजींच्या तोंडून फक्त आह असे उच्चारले गेले होते, असे त्याने म्हटले होते.