2025 Makar Sankranti Haldi Kunku Vaan Ideas मकर संक्रांतीच्या दिवशी धनुर्मास (धुंधुरमास) संपतो. म्हणजे त्या दिवसापर्यंत तांदूळ आणि मुगडाळ यांच्या खिचडीचा नैवेद्य दाखवून जेवण करण्याचा प्रघात आहे. संक्रांतीच्या दिवसात तीळ व गूळ यांना फार महत्त्व आहे कारण या काळात थंडी असते. त्यामुळे गूळ व तीळ यासारख्या उष्ण पदार्थाचे सेवन या काळात आरोग्यवर्धकच आहे.
गुळाची पोळी हे सणांचे वैशिष्ट्य. तिळाचे लाडू किंवा वड्या याही या सणांच्या निमित्तानेच बनतात. या काळात वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा बोर हे शेतातले नवीन उत्पन्न याच काळात होते त्यामुळे याच पदार्थाचे वाण देण्याचाही प्रघात आहे. हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगड असे म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणं सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ, एक तुळशीजवळ व तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलवून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात.
लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला 'पाटावरची वाणं' देतात. म्हणजे वरचे सर्व पदार्थ, तिळगूळ, हळदकुंकू या वस्तू तीन सवाष्णींच्या घरी जाऊन देवासमोर पाट मांडून त्यावर ठेवल्या जातात. या काळात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी एककेकींना वस्तू दिल्या जातात. या वस्तू 'लुटल्या' जातात. पूर्वी काही ठिकाणी सोरट करत असत. 'सोरट'मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तू त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.
लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू (कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर इ.) देतात व नंतरच्या वर्षी आपणाला हव्या असलेल्या इतर वस्तू देतात. तर यावेळी संक्रांती निमित्त काय वाण द्यायचे हा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत.
डिजाइनर ब्लाउज पीस
रुमाल
गजरा वेणी
नारळ
लहान आरशा
बांगड्या
तुळशीचं रोप
ओटीचे सामान
पोटली पर्स
फ्रिजच्या पिशव्या
चपाती कव्हर
कापसाच्या वाती
उदबत्ती
गुलाबजल
मसाले
साबण
सिंदूर स्टिक
रांगोळी साचा
तांब्या
कंगवा
डायरी
पिशवी
स्टोल
कप
नॅपकिन
रवा
साडी कव्हर
तोरण
लिपस्टिक
साडी पिन
मातीची भांडी
मेंदी कोन
वाटी
कासव
कानातले
बॉडी लोशन
लिप बाम
अत्तर
पळी चमचा
रवी
टोपली
ब्रश
कीरिंग्स
नेलपेंट
मध
धार्मिक पुस्तक
पाण्याची बाटली
बटाटे-मटार
साखरचे पॅकेट
गूळ
सौंफ
जिरे
कॉफी सॅशेस
चहा सॅशे
आर्टिफिशल गजरा
आर्टिफिशल फुलं केसांना लावण्यासाठी
खण नथ
खण पर्स