rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकर संक्राती आणि एकादशी एकाच दिवशी ... काय करावे?

मकर संक्राती 2026 तारीख
, बुधवार, 14 जानेवारी 2026 (06:07 IST)
2026 मध्ये 14 जानेवारीला (बुधवार) मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी येत आहेत. हा दुर्मिळ योगायोग तब्बल 23 वर्षांनंतर (काही ठिकाणी अधिक वर्षांनंतर) घडतोय, त्यामुळे हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत शक्तिशाली मानला जातो.
 
मुख्य नियम आणि काय करावे? 
स्नानाचे महत्त्व- या दिवशी सूर्योदयापूर्वी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावे. संक्रांतीला "तीळ" महत्त्वाचे आहेत आणि षट्तिला एकादशीला देखील तिळाचा वापर अनिवार्य मानला जातो. त्यामुळे या एका कृतीने दोन्ही व्रतांची सुरुवात उत्तम होते.
 
एकादशीचे प्राधान्य - एकादशी ही भगवान विष्णूंची तिथी असल्याने, तांदूळ/धान्य स्पर्श करणे, खाणे किंवा दान करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. एकादशीला अन्न दान (विशेषतः तांदळाची खिचडी) करणे व्रतभंग मानले जाते.
 
मकर संक्रांतीचे महत्त्व - सूर्य मकर राशीत प्रवेश करतो (उत्तरायण सुरू होते), त्यामुळे स्नान, दान, तीळ-गूळ, सूर्यनमस्कार खूप पुण्यदायी असतात.
 
या दिवशी काय करावे? 
एकादशी व्रत पाळणारे 
पूर्ण किंवा फलाहारी उपवास करा.
या दिवशी खिचडी/तांदूळ खाणे किंवा दान करणे टाळा. तिळाची खिचडी (तिळ, साबुदाणा, समा, राजगिरा, किंवा फलाहारी सामग्रीने बनवलेली) खा किंवा फक्त फळे, दूध, मूंगफली, साबुदाणा घ्या.
 
तिळाचा सहा प्रकारे वापर (षट्तिला एकादशी)- 
या दिवशी तिळाला विशेष महत्त्व असते. तुम्ही खालील गोष्टी करू शकता जसे
तीळ लावून स्नान करणे.
तीळ उटणे लावणे.
तिळाचे हवन करणे.
तिळाचे पाणी पिणे (एकादशीला चालत असल्यास).
तिळाचे दान करणे (सर्वात महत्त्वाचे).
तिळाचे पदार्थ खाणे (जे उपवासाला चालतात).
तिळ-गूळ खाणे आणि दान करणे खूप शुभ ठरेल शिवाय या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्या, स्नान करा, विष्णू पूजा करा.
 
खिचडी दान 15 जानेवारीला (द्वादशीला) करा- असं करून दोन्ही सणांचे पुण्य मिळेल. एकादशी व्रत न पाळणारे  सामान्य मकर संक्रांतीप्रमाणे नियम पाळू शकता. तरी खिचडीत तांदूळ असल्याने दान करणे आणि खाणे टाळा.
 
दानधर्माचे महत्त्व- 
संक्रांती आणि एकादशी या दोन्ही दिवशी दानाला मोठे महत्त्व आहे.
गरजूंना दान करा जसे काळे तीळ, गूळ, ऊस, धान्य, नवीन वस्त्र किंवा ब्लँकेट दान करावे.
तसेच सुवासिनींना वाण द्या. महिलांनी परंपरेनुसार एकमेकींना वाण देऊन हळदी-कुंकू करावे.
 
एकादशी उपवासाचे सामान्य नियम- 
दशमीच्या रात्रीपासून सात्विक आहार.
एकादशीला ब्रह्मचर्य, जप, कीर्तन, विष्णू पूजा.
रात्री जागरण करा. 
द्वादशीला सकाळी पारण करा (शुभ मुहूर्तात उपवास सोडा). 
 
या दुर्मिळ संयोगामुळे स्नान, दान, जप आणि तीळ दान यांचे फळ हजारपटीने वाढते असे शास्त्र सांगतात. तुमची श्रद्धा आणि परंपरा यानुसार निर्णय घ्या, पण एकादशी नियमांचे उल्लंघन टाळा कारण ते व्रताचे मुख्य फळ कमी करू शकते.
 
काय टाळावे - एकादशी असल्यामुळे या दिवशी भात (तांदूळ) खाणे टाळावे.
कांदा, लसूण किंवा तामसी अन्नाचे सेवन करू नये.
कोणाबद्दलही वाईट बोलू नये किंवा वाद घालू नये.
 
अस्वीकारण: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकर संक्रांतीच्या दिवशी हे खास वास्तु उपाय करा, 12 राशींचे नशीब चमकेल