मकर संक्रांती हा दान देण्याचा सण आहे. वर्ष 2021 मध्ये संक्रांतीचा वाहन सिंह (व्याघ्र) आणि उपवाहन हत्ती आहे. यंदाच्या वर्षात संक्रांतीचे आगमन श्वेत वस्त्र आणि पाटली कंचुकी धारण केलेले बाल्यावस्थेमध्ये कस्तुरी चे उटणे लावून गदा आयुध (शस्त्र) घेऊन स्वर्णपात्रेत अन्न खाताना आग्नेय दिशेकडे बघत पूर्वीकडे जात आहे.
मकर संक्रांतीचा पुण्य काळ -
या वर्षी 2021 मध्ये मकर-संक्रांती चा पुण्यकाळ सकाळी 8:05 ते रात्री 10:46 पर्यंत आहे.
या दिवशी आपण आपल्या राशीनुसार दान केले तर दान केल्याने मिळणारे फळ अनेक पटीने वाढतात. चला तर मग जाणून घ्या आपल्या राशीनुसार कोणते दान देणे आपल्यासाठी शुभ आहे.
मेष - चादर आणि तिळाचे दान केल्याने लवकरच प्रत्येक इच्छा पूर्ण होतात.
वृषभ - कपडे आणि तिळाचे दान केल्याने शुभ आहे.
मिथुन - चादर आणि छत्रीचे दान करावं. असं केल्याने हे फायदेशीर ठरेल.
कर्क - साबुदाणा आणि कपडे दान करणे शुभ फळ देणारे आहे.
सिंह - ब्लँकेट आणि चादरीचे दान आपल्या क्षमतेनुसार करावे.
कन्या - तेल, उडीद डाळीचे दान करावे.
तूळ - कापूस, कपडे, मोहरी, सूती कपड्यांसह चादर देखील दान करावे.
वृश्चिक - खिचडी दान करा आणि आपल्या क्षमतेनुसार ब्लँकेट दान करणे देखील शुभ ठरेल.
धनू- हरभऱ्याची डाळ दान करा तर विशेष फायदे होण्याची शक्यता आहे.
मकर - ब्लँकेट आणि पुस्तके दान करा तर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.
कुंभ - साबू, कपडे, कंगवा आणि अन्नाचे दान करा.
मीन - साबुदाणा, ब्लँकेट, सूती वस्त्र आणि चादर दान करा.