गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!
दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..
शुभ मकर संक्रांती!
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!
आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”